32 C
Mumbai
Tuesday, September 29, 2026
घरविशेष“ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा आहे”

“ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा आहे”

वाहतुक कोंडीत अडकल्यानंतर नितीन गडकरींचे वक्तव्य

Google News Follow

Related

मुंबईतील वाहतूक कोंडीचा अनुभव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही घ्यावा लागला. वरळीहून कार्यक्रमासाठी निघाल्यानंतर गडकरींचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास उशीर झाला. मात्र, या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्याऐवजी गडकरी यांनी मिश्कीलपणे, “ही माझ्याच जुन्या चुकांची शिक्षा आहे,” असं म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

मुंबईतील ‘इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स’ कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या जुन्या निर्णयांचाही संदर्भ दिला. १९९५ ते २००० या काळात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबईत ५५ उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, त्यावेळी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जुन्या पद्धतीचे पूल आणि रस्ते आता अपुरे पडत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महत्त्वाच्या खनिजांचा शस्त्र म्हणून वापर प्रगतीला अडथळा !

झोमॅटोची कॅश ऑन डिलिव्हरीही आता महागणार

हे खरं आहे…रशियाने भारताकडून दीड लाख टन तेल विकत घेतलं

९/११च्या हल्ल्यांपूर्वी ओसामाला भारतात करायचा होता हल्ला

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जुन्या उड्डाणपुलांचा नव्याने विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढत्या वाहनसंख्येला सामोरे जाण्यासाठी केवळ रस्ते रुंद करणे पुरेसे नसून, भविष्यातील वाहतुकीचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी गडकरी यांनी पुण्यासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा आराखडा प्रस्तावित असल्याची माहिती दिली. मलेशियाकडून आणलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच खांबावर अनेक स्तरांचे उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. या बहुस्तरीय मार्गिकेच्या सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो धावू शकते, असे त्यांनी सांगितले.

भारताकडे मोठी क्षमता, तर अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने आहेत. या दोन्हींचा योग्य मेळ साधल्यास पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. वाढत्या शहरांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान आणि बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था हाच पुढचा मार्ग असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा