25 C
Mumbai
Sunday, September 13, 2026
घरदेश दुनिया९/११च्या हल्ल्यांपूर्वी ओसामाला भारतात करायचा होता हल्ला

९/११च्या हल्ल्यांपूर्वी ओसामाला भारतात करायचा होता हल्ला

१९९८च्या CIA अहवालातून खुलासा

Google News Follow

Related

अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१च्या दहशतवादी हल्ल्यांच्या अनेक वर्षे आधी भारतात हल्ले करण्याचा विचार करत होता, असा खुलासा १९९८च्या एका गोपनीयतेतून मुक्त करण्यात आलेल्या सीआयएच्या गुप्तचर अहवालातून झाला आहे.

११ सप्टेंबर २००१च्या दहशतवादी हल्ल्यांना २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमेरिकेने CIAच्या राष्ट्राध्यक्षांसाठी तयार केलेल्या गुप्तचर माहितीच्या कागदपत्रांचा मोठा संच सार्वजनिक केला आहे. या कागदपत्रांमधून हा खुलासा समोर आला आहे.

CIAने माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक गुप्तचर माहिती अहवालांमधील १००हून अधिक पाने सार्वजनिक केली आहेत.

२८ ऑगस्ट १९९८ रोजीच्या राष्ट्राध्यक्षांच्या दैनिक गुप्तचर अहवालात ज्याचे शीर्षक ‘बिन लादेनचे दहशतवादी नेटवर्क अजूनही धोका आहे’ असे होते. या अहवालात ओसामा बिन लादेन हल्ले करण्याचा विचार करत असलेल्या अनेक देशांच्या यादीत भारताचाही समावेश करण्यात आला होता.

अहवालात म्हटले होते, “बिन लादेनचा इजिप्त, अरबी द्वीपकल्प — विशेषतः कुवेत, सौदी अरेबिया आणि येमेन — भारत, पाकिस्तान, युगांडा आणि शक्यतो नायजेरियामध्ये हल्ले करण्याचा मानस आहे.”

मात्र, या दस्तऐवजात भारतामधील कोणतेही विशिष्ट लक्ष्य, हल्ल्याची नियोजित तारीख किंवा कोणत्याही कारवाईच्या योजनेचा तपशील देण्यात आलेला नाही. या गुप्तचर माहितीचा स्रोतही दस्तऐवजात लपवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

13 SEP 2026

जे देखे शशी ते काँग्रेस बघेल कशी ?

मुंबईत कापसापासून साकारला बाप्पा

नाही प्रदूषण, नाही धूर; वंदे भारत आता पश्चिम घाटातून

अहवालात असेही नमूद करण्यात आले होते की, ओसामा बिन लादेनकडे हल्ले करण्यासाठी किमान ६० देशांमध्ये असलेल्या व्यक्तींच्या आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कची मदत घेण्याची क्षमता होती.

ओसामा बिन लादेन अमेरिका आणि ब्रिटनविरुद्ध आणखी हल्ले करण्याच्या पर्यायांचाही विचार करत होता, असे या अहवालात म्हटले होते. मात्र, त्याने त्यावेळी नेमकी कोणती लक्ष्ये निवडली होती किंवा हल्ले कधी केले जाणार होते, याबाबत स्पष्ट माहिती दिली नव्हती.

अहवालात असेही नमूद करण्यात आले होते की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिराना आणि शक्यतो बाकू येथे हल्ल्यांची तयारी करणाऱ्या ओसामा बिन लादेनच्या काही साथीदारांना अटक करण्यात मदत केली होती.

उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियामध्ये ओसामा बिन लादेनचे आधीपासून अस्तित्वात असलेले दहशतवादी नेटवर्कही होते. त्यामुळे या भागांमध्ये अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशा अहवालांना विश्वासार्हता मिळत असल्याचे सीआयएने म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा