29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणपंतप्रधान मोदींच्या रौप्यमहोत्सवी कारकीर्दीनिमित्त सेवा संकल्प

पंतप्रधान मोदींच्या रौप्यमहोत्सवी कारकीर्दीनिमित्त सेवा संकल्प

अमित शहा यांनी मुंबईत केली घोषणा

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या सेवेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजपप्रणित एनडीएकडून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सेवा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा केला जात असल्याचेही शाह यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सलग २५ वर्षे काम करण्याचा विक्रम देशातील मोजक्या नेत्यांनीच केला असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील जेन-झींच्या आंदोलनाबाबत भाजप सरकारची भूमिका स्पष्ट केली. काही महिन्यांपूर्वी तरुणांनी देशभरात केलेल्या आंदोलनाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय झाले, असा प्रश्न शाह यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. काही मुद्द्यांवर लोकांचे वेगवेगळे मत असू शकते आणि ते मांडणेही गरजेचे आहे, असे शाह म्हणाले. सरकार आंदोलनांकडे केवळ विरोध म्हणून पाहत नाही, तर संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर भर देते, असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद

ब्रिक्समधला ‘आय’ मजबूत झालाय…

उत्तर प्रदेशात अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्याला अटक

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली

पत्रकार परिषदेत बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही अमित शाह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “आम्ही प्रत्येक घुसखोराला शोधून शोधून देशाच्या बाहेर काढू,” असे ते म्हणाले. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या आणि निर्णायक निर्णयांची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे तरुणांचे आंदोलन, घुसखोरीचा मुद्दा आणि मोदी सरकारच्या २५ वर्षांच्या सेवेला केंद्रस्थानी ठेवून अमित शाह यांनी सरकारची भूमिका ठामपणे मांडली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा