30 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरविशेषनालासोपाऱ्यात गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली

मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

Google News Follow

नालासोपारा पश्चिमेकडील फन फिएस्टा थिएटरजवळ गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मोरेगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती ट्रॉलीवरून मिरवणुकीत नेली जात असताना अचानक मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. पावसापासून गणेशमूर्तीचे संरक्षण करण्यासाठी कार्यकर्ते प्लास्टिकचे कापड झाकत असतानाच मूर्तीचा अचानक तोल गेला आणि ती थेट मिरवणुकीतील भाविकांच्या अंगावर कोसळली. या प्रकारामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. काही कार्यकर्ते मूर्तीखाली अडकल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.

घटना लक्षात येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले. अनेकांनी मिळून गणेशमूर्ती बाजूला केली आणि मूर्तीखाली अडकलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. गणेशमूर्तीचेही मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वाळवी यांनी या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे स्पष्ट केले. काही काळ मिरवणूक थांबवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि गणेश आगमन सोहळा पुन्हा सुरू करण्यात आला.
हे ही वाचा:
ब्रिक्स विरुद्ध डॉलर

पश्चिम बंगालमध्ये पद्मा नदीत बोट उलटली

मानवजातीचा नाश टाळायचा असेल तर ‘एआय’चा वेग करा कमी!

पंजाबमध्ये गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर तुफान गोळीबार

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरात विविध गणेश मंडळांकडून मोठ्या उत्साहात गणेशमूर्तींचे आगमन केले जात आहे. मात्र, मोठ्या आकाराच्या मूर्ती, ट्रॉली, गर्दी आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे अशा मिरवणुकांमध्ये सुरक्षेचे आव्हान निर्माण होत आहे. नालासोपाऱ्यातील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, काही क्षणांचा विलंब किंवा मदतकार्याला उशीर झाला असता परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. त्यामुळे गणेश आगमन मिरवणुकांपूर्वी ट्रॉलीची सुरक्षितता तपासणे, मूर्ती व्यवस्थित बांधणे, हवामानाचा अंदाज घेणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा