30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरविशेषओयो रूम बुकिंगवर पोलिसांची करडी नजर

ओयो रूम बुकिंगवर पोलिसांची करडी नजर

९० दिवस सीसीटीव्ही रेकॉर्ड बंधनकारक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

नागपूर शहरातील ओयो रूम बुकिंग सेवेला आता अधिक कडक नियमांच्या चौकटीत आणण्याची शक्यता आहे. ओयोच्या माध्यमातून चालणाऱ्या हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवण्यासह सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्याबाबत कठोर नियम लागू करण्याचे संकेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या संदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तयार केलेल्या नियमावलीचे बावनकुळे यांनी कौतुक केले असून, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ओयो हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आवश्यक नोंद ठेवावी लागणार असून, संबंधित ठिकाणचे ९० दिवसांचे सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करणे बंधनकारक असेल. नागपूर शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्सवर ओयोचे फलक दिसून येतात. त्यामुळे या हॉटेल्समध्ये ओयोची सेवा नेमकी कोणत्या पद्धतीने सुरू आहे, त्यासाठी आवश्यक नियमांचे पालन केले जात आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
बिहारमध्ये शिवमंदिरात दगडफेक, लघुशंका केल्याचा आरोप

‘वक्रतुंड महाकाय…’ गणपतीच्या या रूपाचा अर्थ काय?

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा सोन्याला फटका

इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन मच्छिमारी नौकांवर ड्रोन हल्ला

नागपूर शहराची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही नियमावली तयार केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शहरातील सामाजिक वातावरण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागपूरमधील ओयो रूम बुकिंग सेवांवर आता पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये तयार करण्यात आलेली ही नियमावली केवळ शहरापुरती मर्यादित राहणार की राज्यातील इतर शहरांमध्येही ओयो आणि तत्सम हॉटेल बुकिंग सेवांसाठी अशाच प्रकारचे नियम लागू केले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायासोबतच ऑनलाइन रूम बुकिंग सेवांमध्येही ग्राहकांची नोंद, सुरक्षाव्यवस्था आणि देखरेख अधिक काटेकोर होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा