34 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरधर्म संस्कृती'वक्रतुंड महाकाय...' गणपतीच्या या रूपाचा अर्थ काय?

‘वक्रतुंड महाकाय…’ गणपतीच्या या रूपाचा अर्थ काय?

Google News Follow

Related

श्रीगणेश हा त्याच्या अनेकानेक नावाप्रमाणेच विविध रुपात पाहायला मिळतो. प्रत्यक्ष गणपतीची पूजा वा एखाद्या शुभकार्याच्या प्रारंभी “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ | निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा |” हा चिरपरिचित श्लोक सर्वांच्याच सहज ओठी येतो. वक्रतुंड महाकाय ही अष्टाक्षरे गणेशाच्या केवळ शरीरवर्णनासाठी नसून यात आध्यात्मिक, दार्शनिक, पौराणिक संदर्भ, अर्थ दडला आहे.

मुदगल पुराणानुसार गणेशाच्या आठ मुख्य अवतारांपैकी ‘वक्रतुंड’ हा पहिला अवतार. याचा शब्दशः अर्थ ज्याची सोंड किंवा तुण्ड ही वक्राकार, वळलेली तो. तर महाकाय म्हणजे विशाल शरीर असलेला. या अवताराचे मुख्य कार्य मत्सरासुर अर्थात (मत्सर व द्वेष आणि अहंकाराचा राक्षस) याचा नाश करणे हे आहे.

मुद्गल पुराणरचित ” वक्रतुण्डावतारश्च देहानां ब्रह्मधारकः | मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः | या श्लोकातून वक्रतुंड हा ब्रह्म तत्व धारण करणारा मत्सरासुराचा पराभव करणारा सिंहावर आरुढ असलेला अवतार दिसतो. कथेनुसार असुरांचा प्रभावामुळे जगात मत्सर वाढला तेव्हा देवांनी श्रीगणेशाची आराधना केली.या वक्रतुण्ड रुपाने मत्सरासुराचा पराभव करुन त्याला सन्मार्गावर आणले .यावरुन हे रुप मानवी मनातील मत्सर, वाईट प्रवृत्ती , अहंकार नष्ट करण्याचे प्रतीक ठरते. पुढे महाकाय ज्याचे शरीर अत्यंत विशाल आहे असा.असुराशी युद्ध करणारा वक्रतुण्ड स्वतःला ” ब्रह्मरूप म्हणून स्पष्ट करतो हे त्याला दिलेले तात्त्विक स्वरुप आहे.

गणपती सहस्त्रनाम स्तोत्रात वक्रतुण्डो महाकायः कोटिसूर्यसमप्रभः | असं म्हटलं आहे.यात वक्रतुण्ड, महाकाय आणि कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या गणपतीची तीन विशेषणं आहेत. पण पुढे निर्विघ्नं कुरुमेदेव… ही ओळ नाहीय. मात्र श्रीजानकीस्तव राजाच्या मंगलाचरणात हा संपूर्ण श्लोक आढळतो.म्हणून या चार ओळींच्या श्लोकाचा प्र वास एका ग्रंथाऐवजी गणपतीच्या विविध स्तोत्र, उपासनेसाठीच्या रचनांमधून पाहावा लागेल.

वक्रतुण्ड महाकाय….ह्या पूर्ण श्लोकात गणपतीच्या वर्णनानंतर निरविघ्नं कुरुमेदेव या ओळीतून भक्ताची प्रार्थना, मागणं दिसते. बाहेरचे अडथळे दूर करतानाच मनातले मत्सरासारखे अडथळेही दूर व्हावेत अशी प्रार्थना केली जाते. हा श्लोकाचा शब्दशः नाही तर तात्त्विक अर्थ आहे.

आता ‘वक्रतुण्ड महाकाय….’ हा प्रत्येक शुभकार्य सुरु होताना वा रोजच्या पूजेसाठी म्हटला जाणारा श्लोक न राहता वक्रतुण्ड अवतार, सहस्त्रनामातल्या जुळणा-या विशेषणांसह मंगलाचरणातला पूर्ण प्रचलित पाठ आहे. या सगळ्या संदर्भातून श्लोकाचा अर्थ गडद , गहिरा होतो. विराटरुपातल्या गणपतीकडे भक्त आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याची मागणी, प्रार्थना करतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा