28 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणदिशा सालियनला मी कधी भेटलोच नाही!

दिशा सालियनला मी कधी भेटलोच नाही!

आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत प्रथमच दिली प्रतिक्रिया

Google News Follow

दिशा सालियन प्रकरणावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट झाली नसल्याचं सांगितलं. “मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती,” असा स्पष्ट दावा त्यांनी केला. गेल्या सहा वर्षांपासून काही लोक जाणीवपूर्वक आपलं नाव या दुर्दैवी घटनेशी जोडत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी राजकीय हेतूने आणि वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मॅनेजर म्हणून काम करत होत्या. ८ जून २०२० रोजी मुंबईत एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही घटनांचा संबंध जोडून विविध चर्चा सुरू झाल्या. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले आणि गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरे यांचं नावही या चर्चेत वारंवार घेतलं गेलं. मात्र, आदित्य ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले असून, कोणताही तथ्याधारित संबंध नसताना आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांमधून होणाऱ्या चर्चेमुळे सत्य बदलणार नसल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
हे ही वाचा:
आयटीसीकडून सिगारेटच्या किंमतीत पुन्हा वाढ

अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बाल लैंगिक शोषणाच्या कंटेंटवरुन सरकारचा मेटाला इशारा

सुदानमध्ये सोन्याची खाण कोसळून ६७ जणांचा मृत्यू

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेलं नाही. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीविरोधात निष्कर्ष नोंदवला नसून, प्रकरणाची चौकशी करणे हे तपास यंत्रणेचं काम असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्याविरोधातील आरोपांना पुन्हा उत्तर देताना चारित्र्यहनन आणि खोट्या प्रचारामुळे आपण गप्प बसणार नसल्याचं म्हटलं आहे. “सत्यासाठी आणि अन्यायाविरोधात आमची लढाई सुरूच राहील,” असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा