30 C
Mumbai
Monday, September 21, 2026
घरराजकारणतुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळेल!

तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळेल!

सतीश सालियन यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दिशा सालियनला आपण ओळखत नव्हतो, या आदित्य ठाकरे यांच्या दाव्याची दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हवा काढली आहे. आदित्य ठाकरे यांनी सातत्याने केलेल्या खोट्या विधानांची जंत्रीच त्यांनी दिली असून तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेल असं घणाघात केला आहे.

हिच्या मृत्यू प्रकरणावरून तिचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंनी न्यायालयात एफआयआर आणि सीबीआय तपासाला विरोध केला होता, मात्र उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०२६ च्या आदेशान्वये त्यांचा विरोध फेटाळून लावला. तसेच, हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात गेले असून सीबीआयने तपास पूर्ण केला असल्याचा खोटा दावा ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात केला होता, जो सीबीआय पडताळणीत खोटा ठरल्याने वकिलांना न्यायालयाची माफी मागावी लागली होती, याचा पुनरुच्चार केला आहे.

हे ही वाचा:

‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्यपदी कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची पुनर्नियुक्ती

दिशा सालियनला मी कधी भेटलोच नाही!

यूएईकडून ५ हजार बांगलादेशी नागरिकांचा व्हिसा रद्द

शहापूरजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

रिया चक्रवर्तीला ओळखत नसल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा एनसीबीच्या तपासातील चॅट्समुळे खोटा सिद्ध झाल्याचे यात नमूद आहे. मोबाईल टॉवर लोकेशन, ड्रग्ज तस्करीत सहभाग आणि हायड्रोपोनिक वीड सेवनाबाबतचे फोन-सर्व्हेलन्स रेकॉर्ड्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. ८ जून २०२० रोजी आजोबा माधव पाटणकर यांच्या निधनामुळे मुंबईबाहेर असल्याचे ठाकरेंचे विधानही खोटे ठरले. कारण पाटणकर यांचे निधन १४ जून रोजी झाले होते.

माध्यमांच्या हस्तक्षेपामुळेच हे प्रकरण पुन्हा उघडकीस आले असून, तीव्र सार्वजनिक लक्ष आणि मीडिया स्क्रुटिनीमुळे यंत्रणेवर दबाव आणणे कठीण जात असल्यानेच मीडिया डिबेट्सना विरोध केला जात असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. सार्वजनिक परीक्षण निष्पक्ष तपासात अडथळा न आणता तपास भरकटवण्याचे प्रयत्न अधिक कठीण करते असे सांगत ‘सत्यमेव जयते’ने पत्राचा शेवट करण्यात आला आहे. या संपूर्ण आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा