30 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरबिजनेससोने विकून पतीने बायकोला घेतला आयफोन १८ प्रो

सोने विकून पतीने बायकोला घेतला आयफोन १८ प्रो

iPhone 18 Pro खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतात आयफोन १८ प्रो ची विक्री सुरू झाली असून, नेहमीप्रमाणे नवीन आयफोन खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. स्टोअर उघडण्यापूर्वीच अनेक ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नोएडातील डीएलएफ मॉल ऑफ इँडिया येथील ऍप्पल स्टोअरमध्ये सकाळी ८ वाजता स्टोअर सुरू होण्यापूर्वीच मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत दिल्लीतील एका व्यक्तीने सांगितले की, तो आपल्या पत्नीसाठी आयफोन १८ प्रो खरेदी करण्यासाठी आला आहे. त्याच्या पत्नीने जांभळट रंगातील फोन घेण्यास सांगितले होते.

विशेष म्हणजे, पत्नीला हा फोन भेट देण्यासाठी या व्यक्तीने सोने विकल्याचे सांगितले. त्याने म्हटले की, यापूर्वी त्याच्याकडे या फोनसाठी पैसे नव्हते; आता पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळे भविष्यात पैसे असतील किंवा नसतील याचा विचार न करता त्याने आजच पत्नीला हा फोन देण्याचे ठरवले.

हे ही वाचा:

गणेशस्तुतीची ‘पंचरत्ने’

दिल्लीमध्ये १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या

फाळणी करणारा ब्रिटन फाळणीच्या उंबरठ्यावर

सोन्याच्या दरात घसरण; चांदीही स्वस्त

पंजाबमधील गुरदिता सिंग आपल्या मित्रासोबत आयफोन १८ प्रो खरेदी करण्यासाठी नोएड्यात आला होता. त्याचे लवकरच लग्न होणार असून, त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीला हा फोन भेट देण्यासाठी खरेदी केला. गुरदिताचा मित्र म्हणाला की, लग्न जवळ आले असल्याने गुरदिता आपल्या होणाऱ्या पत्नीला हा फोन भेट देत आहे. दोघेही सकाळी ६ वाजल्यापासून ऍप्पल स्टोअरबाहेर रांगेत उभे होते.

गुरदिताने स्वतःसाठी आयफोन १८ प्रो मॅक्सदेखील खरेदी केला. दोन फोनसाठी त्याने ३.५ लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचे त्याने सांगितले. फोन खरेदी केल्यानंतर तो पुन्हा पंजाबला जाणार होता आणि त्याची ट्रेन सकाळी ११ वाजता होती.

पती-पत्नीने एकत्र घेतले दोन आयफोन

नोएडा ऍप्पल स्टोअरमध्ये आणखी एक महिला आपल्या पतीसोबत दोन आयफोन १८ प्रो खरेदी करण्यासाठी आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या फोनची किंमत वाढल्याबाबत तिला विचारले असता, तिने सांगितले की किंमत वाढली असली तरी आयफोन प्रेमी अधिक किंमत देऊनही तो खरेदी करतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा