31 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरधर्म संस्कृतीगणेशस्तुतीची 'पंचरत्ने'

गणेशस्तुतीची ‘पंचरत्ने’

Google News Follow

Related

श्रीगणपती, गजानन हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी, परम तत्त्व रुपात असलेला सर्वांना जवळचा, आपलाच वाटणारा देव. त्याच्या रुप- गुणांचे इतके विविध आणि व्यापक वर्णन सांगणारे अगणित मंत्र, श्लोक, स्तवने रचली आहेत. त्या सगळ्याच रचना, स्तोत्रांचा अभ्यास करणे, परामर्श घेणे हे अंमळ कठीणच. पण म्हणूनच त्यातल्याच काही स्तोत्रांपैकी जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले “गणेश पंचरत्न स्तोत्र” हे त्याच्या इतर प्रसिद्ध आणि प्रभावशाली स्तोत्रामधले एक होय. या मधुर स्तोत्राची रचना ८ व्या शतकात केल्याचे म्हटले जाते. पंचरत्न नावातच त्याचा गर्भितार्थ दडलेला आहे.

गणेश पंचरत्न स्तोत्रामध्ये असलेल्या एकूण सहा श्लोकांपैकी पहिले पाच श्लोक अर्थात ‘पंचरत्ने’. इथे गणपतीच्या रुपाचे, गुणांचे, सामर्थ्याचे वर्णन दिसते. तर सहावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे. म्हणजे याचे नियमाने पठण केल्यास कोणता लाभ होतो हे विशद केले आहे. प्रत्येक श्लोक गणपतीचे एक वेगळे रुप आपल्यासमोर घेऊन येतो.

पहिल्या श्लोकात गणपतीच्या हातातील मोदक हे त्याचे रुप आहे.

मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् |

अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम ||

याचा अर्थ ज्यांच्या हातात आनंदाचे प्रतीक असलेला मोदक अर्थात लाडू शोभतो, जे नेहमी मुक्ती देणारे आहेत, ज्यांनी मस्तकावर चंद्राची कला धारण केली आहे, या सृष्टीचे रक्षण करतात; ज्यांना कुणीही स्वामी किंवा नायक नाही (जे स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत) ज्यांनी गजासूर नामक दैत्याचा नाश केला आहे आणि नतमस्तक होणाऱ्यांच्या सर्व संकटांचा, अमगंलाचा नाश करतात. अशा श्री विनायकाला माझे नमन.

दुसर्‍या श्लोकात गणपतीच्या सामर्थ्याचे वर्णन करण्यासाठी त्यांना विविध उपाधी दिलेल्या आहेत.

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम |

सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाशाच्या परात्परं निरंतरम् ||

याचा अर्थ सांगताना श्रीगणेशाला शत्रूंसाठी भीतीदायक असणारा, सूर्याप्रमाणे तेजस्वी, प्रकाशमान आहे, ज्यांना देव आणि दैत्य सर्व नमन करतात आणि जे शरणागतांना मोठ्या संकटातून त्यांना सोडवतात, जे देवांचे ईश म्हणजे सूरेश्वर, संपत्तीचे स्वामी निधीश्वर, हत्तीचे मुख असलेला देव अर्थात गजेश्वर, गणांचे अधिपती किंवा गणेश्वर आणि सर्वांचे महान देव म्हणजे महेश्वर आहेत अशा परब्रह्म परमेशाला शरण जाऊन भक्ती करते.

तिसरा श्लोक हा गणपतीचे समस्त गुणवर्णन करणारा आहे.

समस्तलोकशंकरं निरस्तदैत्य कुंजरम् दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् |

कृपाकरं क्षमाकरं मुलाकडून यशस्करम् मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ||

यात गणेश लोककल्याणकारी, दैत्यांचा नाश करणारे, विशाल उदर आणि श्रेष्ठ गजरूप मुख असलेले, कृपा-क्षमा-आनंदाचे दाते आणि यश देणारे म्हणून वर्णिले आहेत.

चौथा श्लोक हा गणपतीचे दैवीस्वरुप आणि त्यांचे कुटुंब याच्याशी संबंधित आहे.

अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम्।

प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्॥

इथे अकिंचन अर्थात ज्यांच्याकडे काहीही नाही अशा दीनांच्या वेदना दूर करणारा, चिरंतन वचनांचा विषय असलेला, पुरारि अर्थात भगवान शिवाचा पुत्र, देवांच्या शत्रूंचा गर्व चूर्ण करणारा, प्रपंचाच्या विनाशाच्या वेळी भीषण स्वरूप धारण करणारा आणि गंडस्थळातून मदधारा वाहणाऱ्या प्राचीन गजरूप गणेशाचे मी भजन करतो.

पाचव्या श्लोकामुळे या संपूर्ण स्तोत्राला वेगळीच दिशा मिळते. इथे गणपती योगींच्या हृदयात वास करणारे म्हणून वर्णिले आहेत.

नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकृन्तनम्।

हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्॥

ज्यांच्या दाताची कांती अत्यंत मनोहर आहे, जे अंतक अर्थात मृत्यूचाही अंत करणाऱ्या शिवाचे पुत्र आहेत, ज्यांचे रूप अचिंत्य आणि अनंत आहे, जे सर्व अडथळे दूर करणारे आहेत आणि जे योगींच्या हृदयात निरंतर वास करतात, त्या एकदंत गणेशाचे मी सतत चिंतन करतो.

पहिल्या पाचही श्लोकात गणपतीचे रूप, गुण, सामर्थ्य आणि आध्यात्मिक स्वरूप उलगडले जाते म्हणूनच या पाच श्लोकांना ‘पंचरत्न’ म्हटले आहे. आणि त्यानंतर येतो सहावा श्लोक. हा या स्तोत्राचे फलश्रुती रूप आहे. म्हणजे हे स्तोत्र नियमितपणे पठण करणाऱ्याला कोणते लाभ मिळतात याचा उल्लेख दर्शवला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा