30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरराजकारणउद्धव ठाकरेंची लंडन, श्रीलंकेत बेनामी संपत्ती

उद्धव ठाकरेंची लंडन, श्रीलंकेत बेनामी संपत्ती

नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परदेशातील कथित बेनामी मालमत्तांवरून गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांची लंडन, लखनौ आणि श्रीलंका येथे बेनामी मालमत्ता असल्याची ‘कन्फर्म’ माहिती असल्याचा दावा केला. या मालमत्तेतील एक टक्का हिस्सा जरी मराठवाड्याच्या विकासासाठी वापरला, तरी मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

यावेळी नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये पुरस्कार मिळाल्याच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे यांच्या कामाचे कौतुक झाले किंवा त्यांना पुरस्कार मिळाला की उद्धव ठाकरे यांना त्याचा त्रास होतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच ‘पार्टटाईम राजकारण’ चालत नाही, असे म्हणत शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले. उद्धव ठाकरे यांना समाजकारण आणि राजकारण समजत नसल्याचा दावाही म्हस्के यांनी केला आणि यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुस्तकातील उल्लेखाचा संदर्भ दिला.
हे ही वाचा:
विसर्जनानंतर घरी जाण्याची चिंता मिटली!

पाकिस्तानात गाडी विकत घेण्यास बंदी, लग्नात फक्त एक प्लेट जेवण!

मराठा आंदोलन बरबटलंय?

“व्यावसायिक जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही”

मराठवाड्याच्या दुष्काळाच्या प्रश्नावरूनही म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प बंद करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप त्यांनी केला, तर हा प्रकल्प पुन्हा सुरू केल्याचा दावा केला. मराठवाड्याची ‘दुष्काळवाडा’ ही ओळख पुसण्यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महायुती सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत म्हस्के यांनी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ७९ हजार कोटी रुपये, शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ५४ हजार कोटी रुपये तसेच ३२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा दावा केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा