29 C
Mumbai
Monday, September 21, 2026
घरराजकारणनंदीग्राम पोटनिवडणुकीत ममतांचा काँग्रेसला पाठींबा

नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममतांचा काँग्रेसला पाठींबा

रेजिनगर मतदारसंघात काँग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोठी राजकीय घडामोड घडली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच प्रधान यांना पोलिसांनी अटक केली. ज्या काँग्रेसविरोधात ममता यांनी निवडणूक लढवली, त्यांच्या उमेदवाराला पाठींबा देण्याची वेळ ममतांवर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलन प्रधान हे नंदीग्राम ब्लॉक क्रमांक २ मधील रेयापाडा परिसरात घरोघरी प्रचार करत असताना संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात जुन्या प्रकरणात वॉरंट जारी करण्यात आले होते आणि त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार संचिता प्रधान यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजकीय घडामोडीनंतर काही तासांतच मिलन प्रधान यांना अटक झाल्याने नंदीग्रामच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसने या कारवाईच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी ही कारवाई संशयास्पद असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावत पोलिसांची कारवाई कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
सह्याद्री क्रीडा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव

राहुल गांधींना काँग्रेसचाच इतिहास माहीत नाही!

उद्धव ठाकरेंची लंडन, श्रीलंकेत बेनामी संपत्ती

विसर्जनानंतर घरी जाण्याची चिंता मिटली!

नंदीग्राममध्ये ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने येथे शुभेंदू अधिकारी यांचे दिवंगत माजी सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई हसीरानी रथ यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून मिलन प्रधान, तर इतर पक्षांकडूनही उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे मतदानाला काही आठवडे बाकी असतानाच उमेदवारी मागे घेणे, काँग्रेसला तृणमूलचा पाठिंबा आणि त्यानंतर काँग्रेस उमेदवाराची अटक या सलग घडामोडींमुळे नंदीग्रामची पोटनिवडणूक अधिक चर्चेत आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा