29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरधर्म संस्कृतीसह्याद्री क्रीडा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव

सह्याद्री क्रीडा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव

Google News Follow

Related

मुंबईच्या पूर्व उपनगरातील टिळक नगर, चेंबूर येथील तरुणाईने कबड्डी खेळासाठी १५ ऑगस्ट १९७६ रोजी सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना केली. त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे भाग्य मंडळाला लाभले आहे. स्थापनेच्या काळात गणेशोत्सवासाठी सहकार सिनेमाजवळ छोट्या गणेशमूर्तीची स्थापना करून छोटेखानी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आता सुवर्ण महोत्सव साजरा करणारा हा गणेशोत्सव पुढे गणराया गोल मैदानाच्या विस्तीर्ण जागेत विराजमान झाला.

मंडळाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आजवर अनेक मान्यवरांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कै. अशोक विष्णू सातार्डेकर हे तब्बल ४२ वर्षे सरचिटणीसपदावर होते. त्यानंतर फुटबॉलपटू पीटर फर्नांडिस यांनी ३२ वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. २०१२ मध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी अवघ्या ३५व्या वर्षी तरुण, तडफदार राहुल गजानन वाळंज विराजमान झाले आणि ते आजतागायत या पदावर कायम आहेत.

हे ही वाचा:

“व्यावसायिक जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही”

दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

ट्रॉफी जिंकलीच; पण अय्यरने मनंही जिंकली!

गणेशोत्सव, दहीहंडी ठरणार ‘अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा’

मैदानातील गणेशोत्सवात शनिवारवाडा, लाल किल्ला, अष्टविनायक, अक्षरधाम, अमरनाथ, वैष्णोदेवी यांसारखे भव्य देखावे सादर करण्यात आले. कालांतराने प्रशासकीय नियमांमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे मैदानावरील तंबू समाजमंदिराच्या हॉलमध्ये हलवणे भाग पडले.

यंदा सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाने अध्यक्षांच्या कल्पनेतून साकारलेला ‘सुपर हिरोज’ हा देखावा मुले आणि पालकांसाठी तयार केला आहे. या देखाव्यात स्पायडर-मॅन, छोटा भीम, क्रिश, हल्क, रजनीकांत रोबोट, अ‍ॅव्हेंजर्स मार्व्हल आणि शक्तिमान यांचा समावेश आहे.

मंडळाच्या स्थापनेपासून गणेशमूर्ती घडविण्याचे काम मूर्तिकार बाबी बांदेकर करत होते. गेली ११ वर्षे त्यांची कन्या प्रतिभा बांदेकर-बारस्कार आणि त्यांच्या भगिनी ही जबाबदारी पार पाडत आहेत. यंदाचे कला दिग्दर्शक नितेश कुमार असून, रोषणाईच्या कामात विजय प्रजापती त्यांना साथ देत आहेत. मूर्तीच्या उंचीत मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

उत्सव काळातील आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गुलाल, फटाके व डीजेला स्थान नाही. त्याऐवजी पारंपरिक ढोल-ताशांचा गजर असतो. मंडळाचे उपाध्यक्ष अमित अशोक सातार्डेकर, प्रमुख कार्यवाह राजेंद्र मानसिंग मोहिते, खजिनदार जया शेट्टी, सहकार्यवाह प्रदीप कांबळे, मंगेश अधटराव आणि इतर कार्यकारी समितीचे उत्सवाच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत. ‘सह्याद्री मंडळ’ ‘एक वसाहत, एक होळी’, जागतिक महिला दिन, वटपौर्णिमा यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करते. यंदा गणेशोत्सवातील मालमत्ता, डेकोरेशन तसेच भाविक आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तब्बल ४४ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा