37 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरस्पोर्ट्समहिला कबड्डी संघाने भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्ण

महिला कबड्डी संघाने भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराणचा ३७-३४ पराभव

Google News Follow

Related

भारतीय महिला कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात भारताने इराणचा ३७-३४ असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला संघाने यापूर्वी हांगझोऊ येथे झालेल्या २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने शेवटच्या क्षणापर्यंत आपली पकड मजबूत ठेवली. इराणनेही सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटात इराणला सामन्यात टिकून राहण्यासाठी गुणांची गरज होती. त्याचवेळी भारतीय बचावफळीने आयनाजवर महत्त्वपूर्ण पकड घेतली आणि भारताचा विजय निश्चित केला.

हे ही वाचा:

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

‘लालबागच्या राजा’ला भावपूर्ण निरोप!

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

मुंबईत आज बाप्पाला निरोप

भारताने ३७-३४ असा सामना जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारताकडून शानदार कामगिरी करणाऱ्या संजू देवीने अंतिम सामन्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय महिला कबड्डी संघात पूजा, राज राणी, सोनाली विष्णु शिंगटे, पुष्पा, भावना देवी, रितू, संजू देवी, रितू नेगी, मनीषा कुमारी, पिंकी रॉय, ज्योती आणि निकिता यांचा समावेश होता.

पुरुष कबड्डी संघाचाही अंतिम सामना

भारतीय पुरुष कबड्डी संघाचाही शनिवारी अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना इराणशी होणार आहे. भारतीय पुरुष संघ गतविजेता असून यंदाही इराणविरुद्ध विजय मिळवत आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

सावन बरवालला मॅरेथॉनमध्ये रौप्य

भारतीय पथकासाठी शनिवारचा दिवस पदकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये २:११:३७ अशी राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. बरवालच्या या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची तब्बल ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदरसा विनोद यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आणखी एक रौप्यपदक जिंकले. स्क्वॉशमध्ये जोशना चिनप्पा आणि वेलावन सेंथिलकुमार यांच्या जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या टॅंग मिंग होंग आणि ली का यी यांच्याविरुद्ध पराभव पत्करला. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदक मिळाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा