28 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरविशेष'लालबागच्या राजा'ला भावपूर्ण निरोप!

‘लालबागच्या राजा’ला भावपूर्ण निरोप!

मुंबईसह उपनगरांचा परिसर विसर्जन मिरवणुकांनी दुमदुमला

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने मुंबईसह उपनगरांचा परिसर शुक्रवारी विसर्जन मिरवणुकांनी दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांसह गिरगाव चौपाटीवरही भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाला शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात साश्रू नयनांनी भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल २२ ते २३ तासांनंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचली. शनिवारी सकाळी स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गुलालाची उधळण पाहायला मिळाली. बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. लालबागच्या राजासह मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शुक्रवारी सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी सकाळपर्यंत सुरू होत्या.

लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, परळचा महाराजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रमुख गणपतींचेही गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. या विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी आणि आसपासच्या परिसरात पोलिस तसेच महापालिका प्रशासनाकडून गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा; भाजप आमदाराला काढले बाहेर

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

शहबाज शरीफांचा ‘विजया’चा दावा अन् भारतीय अधिकाऱ्याचे हसू

‘मनहूस देश’ म्हणणाऱ्या निवेदिता मेनन यांच्या व्याख्यानाला विरोध

दरम्यान, गणेशगल्लीतील प्रसिद्ध ‘मुंबईच्या राजा’चे यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. २२ फूट उंच भव्य मूर्ती बार्ज जहाजाच्या माध्यमातून थेट खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्यात आली. गिरगाव चौपाटीवरून बार्जच्या माध्यमातून ही मूर्ती समुद्रात नेण्यात आली आणि त्यानंतर खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले. मुंबईतील गणेशोत्सवाच्या इतिहासात मोठ्या मूर्तीचे अशा प्रकारे बार्जच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जन करण्याचा हा महत्त्वाचा प्रयोग ठरला. या पद्धतीमुळे गिरगाव चौपाटीवरील गर्दीचा ताण कमी करण्यासह विसर्जनाची प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास मदत झाली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा