26 C
Mumbai
Wednesday, September 30, 2026
घरविशेष‘मनहूस देश’ म्हणणाऱ्या निवेदिता मेनन यांच्या व्याख्यानाला विरोध

‘मनहूस देश’ म्हणणाऱ्या निवेदिता मेनन यांच्या व्याख्यानाला विरोध

जुन्या वक्तव्यांचा दाखला देत उदयपूरमधील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

Google News Follow

Related

जेएनयूच्या माजी प्राध्यापिका निवेदिता मेनन यांच्या उदयपूरमधील प्रस्तावित व्याख्यानावरून वाद निर्माण झाला आहे. मेनन यांच्या जम्मू-काश्मीर, राष्ट्रवाद आणि भारताच्या राजकीय व्यवस्थेबाबतच्या जुन्या वक्तव्यांचा दाखला देत काही सामाजिक संघटनांनी राम मेहता ट्रस्टकडे त्यांचे व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली आहे.

उदयपूरमधील विद्या भवन सभागृहात मेनन यांचे राम मेहता मेमोरियल लेक्चर आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी मेनन यांना आमंत्रित करण्याच्या निर्णयावर काही संघटनांनी १९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत आक्षेप नोंदवला. मेनन यांनी यापूर्वी देशाची सार्वभौमता, काश्मीर आणि राष्ट्रवादाबाबत केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी दाखला दिला.

मेनन यांच्या २०१६ मधील एका व्याख्यानाचा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी आहे. जेएनयूमध्ये राष्ट्रवाद आणि काश्मीरच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ‘भारत काश्मीरवर बेकायदेशीर कब्जा करत आहे’, असे विधान केल्याचे वृत्त आहे. या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. २०१७ मध्येही राजस्थानमधील जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर येथे मेनन यांच्या व्याख्यानावरूनही वाद झाला होता. ‘History Reinterpreted: Nation, Individual and Culture’ या विषयावर त्या बोलण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या काश्मीर आणि भारतीय सैनिकांबाबतच्या कथित वक्तव्यांवर विद्यापीठाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती.

विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनी मेनन यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नसल्याचे तसेच भारतीय सैनिक सीमेवर देशासाठी नव्हे, तर रोजगारासाठी काम करतात, अशा आशयाची वक्तव्ये केल्याचा आरोप केला होता. मेनन यांनी हे आरोप फेटाळून लावत वादाला राजकीय रंग दिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर विद्यापीठात निदर्शनेही झाली होती. मेनन यांच्या अलीकडील एका मुलाखतीतील वक्तव्यामुळेही त्यांच्यावर टीका होत आहे. पत्रकार मंदीप पुनिया यांच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत भारतातील राजकीय वातावरण, मुस्लिम समाज, विद्यार्थी आंदोलने आणि गेल्या दशकातील राजकीय घडामोडींवर चर्चा करताना त्यांनी भारताचा उल्लेख ‘इस मनहूस देश’, म्हणजेच ‘शापित देश’ अशा अर्थाने केला होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये लष्कराचे, लष्कराद्वारे, लष्करासाठी चालवले जाणारे सरकार!

इराणचा शांततेचा प्रस्ताव ट्रम्पनी धुडकावला

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

मुंबईत आज बाप्पाला निरोप

या पार्श्वभूमीवर उदयपूरमधील काही सामाजिक संघटनांनी राम मेहता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे मेनन यांचे व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली आहे. डॉ. परमवीर सिंह दुलावत यांनी मेनन यांच्या जुन्या वक्तव्यांचा दाखला देत त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रम रद्द न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आल्याचे वृत्त आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा