28 C
Mumbai
Wednesday, September 30, 2026
घरविशेषभारताला धडा शिकवल्याचा शरीफ यांचा दावा; तेवढ्यात कुणीतरी फसकन हसले!

भारताला धडा शिकवल्याचा शरीफ यांचा दावा; तेवढ्यात कुणीतरी फसकन हसले!

संयुक्त राष्ट्र महासभेतील व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

संयुक्त राष्ट्र महासभेतील पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणातील एका दाव्यावर भारतीय अधिकाऱ्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे. शहबाज शरीफ यांनी २०२५ मधील भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्कराने भारताच्या हल्ल्यांना अचूकतेने आणि व्यावसायिकतेने प्रत्युत्तर दिले, असा दावा केला. त्याच वेळी कॅमेऱ्यात भारताच्या शिष्टमंडळातील आर. श्रीनिवास यांची प्रतिक्रिया कैद झाली असून त्यांचा हसतानाचा आणि डोके हलवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत ही कारवाई करण्यात आली होती.

संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणात शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्कराचे कौतुक केले. “त्यांनी शत्रूला शांत केले, त्याचा हल्ला परतवून लावला आणि असा धडा शिकवला, जो तो कधीही विसरणार नाही,” असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याच्या वेळी कॅमेरा भारतीय शिष्टमंडळातील आर. श्रीनिवास यांच्याकडे वळला. ते डोके हलवत आणि उपरोधिक हसू देताना दिसले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हे ही वाचा:

‘मनहूस देश’ म्हणणाऱ्या निवेदिता मेनन यांच्या व्याख्यानाला विरोध

पाकिस्तानमध्ये लष्कराचे, लष्कराद्वारे, लष्करासाठी चालवले जाणारे सरकार!

इराणचा शांततेचा प्रस्ताव ट्रम्पनी धुडकावला

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

शहबाज शरीफ यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कथित हस्तक्षेपाचेही कौतुक केले. ट्रम्प यांच्या “वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे” दक्षिण आशियातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले, असा दावा शरीफ यांनी केला. मात्र, भारताची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे की मे २०२५ मधील संघर्ष थांबवण्याबाबतचा निर्णय भारत आणि पाकिस्तानच्या लष्करांमधील थेट संवादातून झाला आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी नव्हती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा