29 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरराजकारणबालाकोट ते ऑपरेशन सिंदूर...भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा!

बालाकोट ते ऑपरेशन सिंदूर…भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा!

नरेंद्र मोदींनी मन की बातमधून सर्जिकल स्ट्राइक्सच्या दशकपूर्तीबद्दल केले भाष्य

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या लोकप्रिय मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १३८व्या भागातून देशवासीयांना संबोधित केले. हा भाग विशेष ठरला. सर्जिकल स्ट्राइकच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या निर्णायक धोरणावर सविस्तर भाष्य केले.

“दहा वर्षांपूर्वी २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन आपल्या शूर जवानांनी दहशतवादाविरोधात ज्या पद्धतीने कारवाई केली, ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. सर्जिकल स्ट्राइकने संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवे उदाहरण ठामपणे मांडले.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी देशातील सर्व नागरिकांचे स्वागत करतो. ‘मन की बात’मध्ये आपण देशवासीयांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो. देशाच्या उपलब्धींची चर्चा करतो. भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक उपलब्धीला एक दिवसानंतर दहा वर्षे पूर्ण होणार आहेत. ही उपलब्धी म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राइक’.”

भारताने दीर्घकाळ दहशतवादी हल्ल्यांमुळे सहन केलेल्या वेदनेविरोधातील सर्जिकल स्ट्राइक ही निर्णायक प्रतिक्रिया होती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गेल्या दशकात भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात झालेल्या बदलाचा उल्लेख करताना त्यांनी बालाकोट एअर स्ट्राइकपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत भारताने वारंवार स्पष्ट संदेश दिल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट संदेश भारताने दिल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा:

तिरंदाजीत भारताची दमदार आगेकूच; चार संघ उपांत्य फेरीत

आशियाई गेम्समधील भारताचे बॅडमिंटन आव्हान संपले

दक्षिण आफ्रिकेत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; १७ जणांचा मृत्यू

ज्ञानेश कुमार माफीचे साक्षीदार, आरोपी नरेंद्र मोदी..

साखळी बॉम्बस्फोट सामान्य बाब होती!

देशातील जुन्या परिस्थितीची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एक काळ असा होता, जेव्हा भारतात साखळी बॉम्बस्फोट होणे ही अगदी सामान्य बाब झाली होती. सप्टेंबर महिन्यातच, म्हणजे १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच मुंबईत २६/११चा एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला.”

पूर्वी प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असे. मात्र, त्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नव्हते आणि वेळ निघून जाण्याची प्रतीक्षा केली जात होती, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. ते म्हणाले, “आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता धोरण घेऊन पुढे जात आहे आणि त्याचे परिणामही आपण पाहत आहोत.”

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या २५व्या स्मृतिदिनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “यावर्षी ९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले, त्यामध्ये अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा