29.1 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामाअरुणाचलमध्ये बाल तस्करीचा पर्दाफाश; ५१ जणांची सुटका

अरुणाचलमध्ये बाल तस्करीचा पर्दाफाश; ५१ जणांची सुटका

पाच आरोपींना अटक

Google News Follow

अरुणाचल प्रदेशातील नामसाई जिल्ह्यात बाल तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४७ मुलांसह ५१ जणांची सुटका केली असून, या प्रकरणात पाचवा कथित मध्यस्थही अटकेत आला आहे. रविवारी पोलिसांनी नामसाई येथील काबा गावातून एमा लोयी याला अटक केली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले भविष्य देण्याचे आमिष दाखवून त्यांना पालकांपासून दूर नेले जात असल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला १९ मुलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार केल्यानंतर विविध भागांतून आणखी मुलांची सुटका करण्यात आली आणि हा आकडा ४७ वर पोहोचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नामसाई पोलिस ठाण्यात १७ ऑगस्ट २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा बालकल्याण समितीच्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात झाली. शि-योमी जिल्ह्यातील मेचुका, वेस्ट सियांगमधील आलो, ईस्ट सियांगमधील पासीघाट, नाहरलागुन, इटानगर आणि लोंगडिंग यांसह विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. तपासात काही मुलांना घरकामासाठी, तर काहींना हॉटेलमध्ये काम करण्यासाठी नेण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मध्यस्थांचा वापर केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रत्येक मुलामागे १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली असून, या पैशांच्या व्यवहाराचा आणि संपूर्ण नेटवर्कचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
ज्ञानेशकुमारांविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन

रमीकल्चरची ५०० कोटींची मालमत्ता जप्त

हुमायून कबीरची अभद्र भाषा… अल्लाहने शुभेंदूंचे तिकीट बुक करावे

आयआयटी मुंबईत एससी, एसटी, ओबीसी प्राध्यापकांची कमतरता
या कारवाईत नामसाई पोलिसांसोबत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती, चाइल्ड हेल्पलाइन आणि इतर बाल संरक्षण संस्थांचा सहभाग आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांकडून आता या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेतला जात असून, मुलांना पालकांकडून मध्यस्थांमार्फत कथित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या संपूर्ण साखळीचा तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, मुलांना नेमके कुठे आणि कोणत्या कारणासाठी नेण्यात आले होते, तसेच आर्थिक व्यवहारामागे कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा