31 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरविशेषरमीकल्चरची ५०० कोटींची मालमत्ता जप्त

रमीकल्चरची ५०० कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने केली कारवाई

Google News Follow

Related

ऑनलाइन रमी गेमिंग प्लॅटफॉर्म रमीकल्चरशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने तब्बल ४४२.३५ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत फिक्स्ड डिपॉझिटमधील रक्कम, व्यावसायिक दुकाने, एक व्हिला आणि अनेक निवासी मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीजच्या भागधारकांच्या कुटुंबीयांच्या नावावर, खासगी फॅमिली ट्रस्ट आणि संबंधित कंपन्यांच्या नावावर असल्याचे ईडीने म्हटले आहे. या नव्या कारवाईनंतर या प्रकरणात आतापर्यंत जप्त, गोठवलेल्या किंवा अटॅच केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत तब्बल २,८४३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ईडीच्या तपासानुसार, गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज आणि रमीटाइम टेक्नॉलॉजीज या कंपन्या रमीकल्चर, रमीप्राइम, प्लेशिप आणि रमीटाइम यांसारख्या अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन रिअल मनी गेमिंग चालवत होत्या. या प्लॅटफॉर्मशी देशभरातील सुमारे ३ कोटी वापरकर्ते जोडले गेले होते. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसारख्या ऑनलाइन रिअल मनी गेमिंगवर निर्बंध असलेल्या राज्यांमधील वापरकर्तेही या प्लॅटफॉर्मवर असल्याचा दावा ईडीने केला आहे. याशिवाय, वापरकर्त्यांना गेम पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचे सांगितले जात असतानाच प्रत्यक्षात बॉट्स म्हणजेच ऑटोमेटेड प्रोग्राम आणि अल्गोरिदमचा वापर केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणेने केला आहे. या बॉट्समुळे काही वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यातून कंपन्यांना कथित गुन्ह्यातून मिळकत झाल्याचा ईडीचा आरोप आहे.
हे ही वाचा:
माफी मागून मोकळे झाले होते, डोवालांविरुध्द खोटे विकणारे…

आयआयटी मुंबईत एससी, एसटी, ओबीसी प्राध्यापकांची कमतरता

…म्हणून प्रवेश कुमार यांनी युवकाच्या कानशिलात लगावली

‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदे खंडणी, मारहाण प्रकरणी गेली गजाआड

या तपासात वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बोनस, रेफरल इन्सेंटिव्ह, मोफत स्पर्धा आणि विविध प्रमोशनल ऑफर्सचा वापर केल्याचेही ईडीने नमूद केले आहे. कंपन्यांनी मार्केटिंग आणि प्रमोशनवर सुमारे १,०३५ कोटी रुपये खर्च केल्याचे तपासात समोर आल्याचा दावा आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, कथितरित्या मिळालेली रक्कम डिव्हिडंड आणि शेअर बाय-बॅकच्या माध्यमातून भागधारकांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यानंतर म्युच्युअल फंड, बाँड, इक्विटी शेअर्स तसेच महागड्या स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यात आली. यापूर्वीही ईडीने या प्रकरणात मालमत्ता गोठवणे आणि जप्त करण्याची कारवाई केली होती. आता नव्या ४४२ कोटींच्या कारवाईमुळे ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील या प्रकरणाची व्याप्ती आणि आर्थिक व्यवहारांवरील तपास आणखी गंभीर झाला आहे. मात्र, ईडीने केलेले हे आरोप तपासाचा भाग असून प्रकरणातील अंतिम कायदेशीर निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा