29.6 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषभारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे ९/११ सारखी दुर्घटना टळली!

भारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे ९/११ सारखी दुर्घटना टळली!

वैमानिकासाठी मोदींकडून गौरवोद्गार

Google News Follow

फ्लायदुबईच्या विमानात जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जात असतानाही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या कॅप्टन स्मित माछर यांच्या धैर्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात उल्लेख केला. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या संयम, प्रसंगावधान आणि धैर्याचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काल घडलेल्या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत संयम, विवेक आणि धैर्य दाखवले. या भारतीय वैमानिकाच्या शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे ९/११ सारखी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही स्मित यांच्या शौर्याचा उल्लेख केल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. कॅप्टन स्मित यांच्या धैर्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याचे मोदी यांनी सांगितले.”

नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधल्याची माहितीही दिली. त्यांनी त्यांचे वडील भूपेंद्र, आई गीता आणि पत्नी सोनल यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कॅप्टन स्मित यांच्यावर सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशवासीयांनी प्रार्थना करावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

हे ही वाचा:

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ जण दगावले

शाहजहांपुरमध्ये मंदिराच्या जमिन वादावरून दोन साधूंना जाळले

पाकिस्तानातून हवालामार्गे पैसा, यासिन मलिकसह सात जणांवर आरोप निश्चित

रील पाहून भाजी विक्रेत्याने घरातच लावले नकली नोटांचे ‘झाड’

दरम्यान, फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवकडे जात असताना कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित माछर यांच्यावर सहवैमानिकाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात स्मित गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला नियंत्रणात आणले. विमानाचे तबूक, सौदी अरेबिया येथे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १७४ जण होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा