36 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरक्राईमनामारील पाहून भाजी विक्रेत्याने घरातच लावले नकली नोटांचे 'झाड'

रील पाहून भाजी विक्रेत्याने घरातच लावले नकली नोटांचे ‘झाड’

राजकोटमधून अटक

Google News Follow

Related

गुजरातमधील राजकोटमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेऊन घरातच नकली चलनी नोटा तयार करणाऱ्या भाजी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. किशन सोलंकी असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १०० रुपये आणि ५०० रुपयांच्या एकूण २१९ बनावट नोटांसह नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ६५,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजकोट शहर गुन्हे शाखा आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या संयुक्त पथकाने मंडाडुंगर परिसरातील एका घरावर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून १००च्या २१६ आणि ५००च्या तीन बनावट नोटा आढळून आल्या. याशिवाय सीपीयू, मॉनिटर, दोन प्रिंटर, लॅमिनेटर हीटर मशीन, बटर पेपर आणि १००च्या नोटांची छपाई केलेले कागदही पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत किशन सोलंकीने बनावट नोटा तयार करण्याची सुरुवात कशी केली, याची माहिती दिली. तो भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. कमी उत्पन्नामुळे त्याच्यावर कर्ज वाढले होते. याच काळात इंस्टाग्रामवर रील पाहताना त्याला १०० आणि ५००च्या बनावट नोटा तयार करण्यासंदर्भातील व्हिडीओ दिसला. त्यानंतर त्याने संबंधित अकाउंटच्या व्यक्तीशी संपर्क साधला. पुढे टेलिग्रामच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद झाला आणि बनावट नोटा छापण्याची प्रक्रिया शिकल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीला आरोपीने १० हजार किमतीच्या बनावट नोटा दिल्या आणि त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीने आरोपीला ३ हजार दिले. या व्यक्तीचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा:

भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत; मोदी-नेतन्याहूंकडून कौतुक

फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छर कोण?

इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला

लवलीनाचा ठोसा, सुवर्णाची आशा

पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपी बनावट नोटा मोठ्या प्रमाणात विकत नव्हता. तो स्वतःच वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी करून या नोटा चलनात आणत असल्याचे समोर आले आहे. गेल्या ४ ते ५ महिन्यांत त्याने सुमारे ४० बनावट १००च्या नोटा बाजारात चलनात आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या जन्माष्टमी मेळ्यातही त्याने छोट्या खरेदीसाठी या नोटांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा