28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषफ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित माछर कोण?

फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित माछर कोण?

सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्याची घटना

Google News Follow

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विमानाचे कॅप्टन स्मित माछर जखमी झाले. मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी प्रसंगावधान राखल्याने विमानातील १७४ प्रवाशांसह इतर क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवणे शक्य झाले. या घटनेची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनीही घेतली आहे.

स्मित माछर हे गेल्या चार वर्षांपासून फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी सुमारे १० वर्षे स्पाइसजेटमध्ये काम केले. बोईंग ७३७ विमानांच्या ताफ्यावर त्यांना १३ वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्या नावावर ९,७५० हून अधिक फ्लाइंग तास असल्याची माहिती आहे. माछर यांनी २०११ मध्ये स्पाइसजेटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात त्यांनी लाइन ट्रेनिंग कॅप्टन आणि वरिष्ठ कमांडरसह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. नोव्हेंबर २०२० पासून ते लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून इतर वैमानिकांच्या प्रशिक्षणाशी संबंधित जबाबदारीही पार पाडत होते. जून २०२२ मध्ये त्यांनी स्पाइसजेट सोडून फ्लायदुबईमध्ये डायरेक्ट-एंट्री कॅप्टन म्हणून प्रवेश केला.

मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. स्मित यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी दुबईला स्थलांतरित झाले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांशी अजूनही शेजाऱ्यांचे जवळचे संबंध आहेत. बालपणीचा मित्र प्रतीक गांधी याने स्मित यांना लहानपणापासूनच शांत आणि संयमी स्वभावाचा असल्याचे सांगितले. डॉक्टर आणि शेजारी जीनित शाह यांनीही आपत्कालीन परिस्थितीत स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता महत्त्वाची ठरल्याचे म्हटले. कुटुंबीय उपचारासाठी सौदी अरेबियात गेले असून, शेजारी त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेटची प्रतीक्षा करत आहेत.

वैमानिक होणे हे स्मित माछर यांचे बालपणापासूनचे स्वप्न नव्हते. जुन्या पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, शालेय शिक्षणानंतर त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायाशी संबंधित टेक्स्टाइल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम निवडला होता. त्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटचा अभ्यास सुरू केला. याच काळात एका एव्हिएशन सेमिनारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची कल्पना आवडली. त्यावेळी ते १९ वर्षांचे होते. यानंतर त्यांनी न्यूझीलंडमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले.

हे ही वाचा:

इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला

लवलीनाचा ठोसा, सुवर्णाची आशा

राजेश-चिकिथाचा सुवर्णवेध, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के!

इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

फ्लायदुबईच्या विमानात नेमकं काय घडलं?

फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळाकडे जात होते. विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि सहवैमानिकामध्ये झटापट झाली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या माहितीनुसार, एका वैमानिकाने विमानाच्या यंत्रणेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत स्मित माछर यांच्यावर चाकूने हल्ला झाला. हल्ल्यानंतर विमानाची उंची काही वेळातच १७,४०० फूटांहून अधिक कमी झाली. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर विमान सौदी अरेबियातील ताबुक विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानातील क्रू आणि प्रवाशांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला आवरले. त्यानंतर विमानाचे नियंत्रण स्थिर करण्यात आले आणि ताबुक येथे सुरक्षित लँडिंग झाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा