38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामा‘दृश्यम-३’पाहून रचला वडिलांच्या हत्येचा कट

‘दृश्यम-३’पाहून रचला वडिलांच्या हत्येचा कट

एका चुकीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Google News Follow

Related

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एका हत्याकांडाने ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २६ वर्षीय शिवशंकर साहनी याने ‘दृश्यम-३’ चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा कथित कट रचला. सुरतमध्ये राहणारा शिवशंकर तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास करून बिहारमधील आपल्या गावात पोहोचला. २६ जुलैच्या रात्री घराबाहेर झोपलेल्या त्याचे वडील रघुवीर साहनी यांच्यावर त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात रघुवीर साहनी यांचा मृत्यू झाला. वडील आणि मुलामध्ये जमीन आणि कौटुंबिक कारणांवरून आधीपासून वाद असल्याचे तपासात समोर आले आहे.

हत्येपूर्वी शिवशंकरने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नियोजन केल्याचा आरोप आहे. सुरतहून बिहारकडे येताना त्याने मोबाईल फोन बंद ठेवला होता. पटना आणि हाजीपूरमार्गे तो पाटोरी रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्यानंतर रिक्षाने आणि काही अंतर पायी प्रवास करून तो आपल्या गावात गेला. रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून त्याने झोपलेल्या वडिलांवर हल्ला केला आणि त्यानंतर पुन्हा पाटोरी रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला. वडिलांच्या हत्येनंतर स्वतःचे लोकेशन लपवून पोलिसांना चकवा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, याच योजनेत त्याच्याकडून एक मोठी चूक झाली.

पाटोरी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर शिवशंकरने काही वेळासाठी आपला मोबाईल फोन सुरू केला आणि पत्नीला फोन केला. त्यानंतर पुन्हा फोन बंद केला. पोलिसांच्या तांत्रिक तपासात या कॉलचे लोकेशन पाटोरी परिसरात आढळले. हत्येच्या वेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकरविरोधात हा कॉल महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर त्याचा माग काढला. हत्येनंतर सुमारे ३६ तासांनी त्याचा मोबाईल पुन्हा सुरतमध्ये सक्रिय झाल्याचेही तपासात समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी सुरतमध्ये सापळा रचून शिवशंकरला अटक केली.

चौकशीदरम्यान त्याने ‘दृश्यम’ चित्रपटापासून प्रेरणा घेतल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. चित्रपटातील तपास यंत्रणेला चकवा देण्याच्या पद्धती प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्याचा प्रयत्न त्याने केला; मात्र पत्नीला केलेल्या एका फोन कॉलमुळे संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाने गुन्हा लपवण्यासाठी कितीही नियोजन केले तरी मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे तपास यंत्रणेसाठी निर्णायक ठरू शकतात, हे पुन्हा स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा