28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरदेश दुनियाड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

ड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

अजब सुरक्षा मोहीम चर्चेत

Google News Follow

पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेसमोर ड्रोन हल्ल्यांचे आव्हान वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी पाकिस्तानने अजब शक्कल लढवली आहे. ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी चक्क मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांचा आधार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील संवेदनशील पोलीस आणि लष्करी चौक्यांवर ड्रोनपासून संरक्षण मिळवण्यासाठी फिशिंग नेट लावण्यात येत आहेत.

या फिशिंग नेटचे जाळे चौकीच्या छतावर काही मीटर उंचीवर बसवण्यात येते. चौकीच्या छतापासून आसपासच्या भिंतींपर्यंत जाळी ताणली जाते. त्यामागचा उद्देश स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनच्या प्रोपेलरला जाळ्यात अडकवणे हा आहे. ड्रोन जाळ्यात अडकल्यास तो थांबवता किंवा निष्क्रिय करता येईल, असा पोलिसांचा दावा आहे. ड्रोन जाळ्यात अडकला नाही आणि जाळ्याच्या वरच स्फोट झाला तरी त्यातील तुकडे थेट जमिनीवर कोसळण्याऐवजी हवेत पसरल्याने नुकसान काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानने हा उपाय प्रामुख्याने कमी खर्चामुळे स्वीकारल्याचे बोलले जात आहे. एका चौकीवर अशा प्रकारचे जाळे बसवण्यासाठी सुमारे १,४०० डॉलर म्हणजेच अंदाजे १.३० लाख रुपये खर्च येतो. त्याच्या तुलनेत आधुनिक अँटी-ड्रोन यंत्रणांची किंमत हजारो डॉलरपासून लाखो डॉलरपर्यंत जाऊ शकते. गेल्या काही महिन्यांत खैबर पख्तूनख्वामधील कोहाट, करक, बन्नू, लक्की मारवत आणि डेरा इस्माईल खान या पाच जिल्ह्यांमधील संवेदनशील लष्करी आणि पोलीस चौक्यांवर फिशिंग नेट लावण्यात आल्याचे वृत्त आहे.

या उपायामागे पाकिस्तानच्या सुरक्षादलांवरील वाढते ड्रोन हल्ले कारणीभूत आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या हंगू जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी सर्की पियाला पोलीस चौकीवर ड्रोनमधून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सशस्त्र हल्लेखोरांनी चौकीवर गोळीबारही केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हंगू जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत १६ हल्ले झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सुरक्षादलांनी चौक्यांवर अतिरिक्त संरक्षणात्मक व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

सोरोस याच्याकडून निधी मिळालेल्या सीएआयआरवर ‘दहशतवादी’ शिक्का

सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान-तुर्कीचे सैन्य होणार तैनात

फ्लायदुबईचे ‘ते’ विमान पाडण्यास इस्रायल होता सज्ज

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

या हल्ल्यांमागे पाकिस्तान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीचा हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर टीटीपीला आश्रय दिल्याचा आरोप करत आला आहे. मात्र, काबूलने हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावही अलीकडच्या काळात वाढला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा