27.9 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरदेश दुनियाफ्लायदुबईचे ‘ते’ विमान पाडण्यास इस्रायल होता सज्ज

फ्लायदुबईचे ‘ते’ विमान पाडण्यास इस्रायल होता सज्ज

फायटर जेट्स तैनात

Google News Follow

Related

फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील कॉकपिट हल्ल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान हायजॅक झाल्याचे स्पष्ट झाले असते आणि ते तेल अवीवच्या दिशेने पुढे जात राहिले असते, तर इस्रायलने ते पाडण्याची तयारी केली होती, असा दावा ‘सीबीएस न्यूज’ने दोन इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला आहे.

३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने कॅप्टन स्मित माछर यांच्यावर कॉकपिटमध्ये हल्ला केला. त्यानंतर विमानाची उंची काही वेळातच सुमारे १४ ते १६ हजार फूटांनी कमी झाली. कॉकपिटमधून प्रतिसाद मिळत नसल्याने इस्रायली अधिकाऱ्यांना विमान हायजॅक झाल्याची किंवा त्याचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर होण्याची भीती निर्माण झाली.

वृत्तानुसार, विमानाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर इस्रायली हवाई दलाने फायटर जेट्स सज्ज केली. इस्रायलने आपले हवाई क्षेत्रही बंद केले आणि संभाव्य ‘९/११सारख्या’ हल्ल्याच्या परिस्थितीसाठी आधीपासून निश्चित असलेली आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. विमान इस्रायलच्या दिशेनेच पुढे गेले असते, तर फायटर जेट्स त्याच्या जवळ जाऊन कॉकपिटशी संपर्क साधण्याचा आणि विमानातील परिस्थितीची पाहणी करण्याचा प्रयत्न करणार होते. विमान हायजॅक झाल्याचे निश्चित झाले आणि त्यातून कोणताही रेडिओ प्रतिसाद किंवा मागणी आली नसती, तर पुढील निर्णयासाठी प्रकरण संरक्षणमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत नेण्याची प्रक्रिया असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

विमानाने इस्रायलकडेच कूच सुरू ठेवली असती आणि ते हायजॅक झाले असल्याचे निश्चित झाले असते, तर ते पाडण्याचा अंतिम निर्णय इस्रायलच्या पंतप्रधानांकडे असता. विमानाचा वापर तेल अवीवमधील महत्त्वाच्या ठिकाणावर किंवा बेन गुरियन विमानतळासारख्या लक्ष्यावर हल्ल्यासाठी होण्यापेक्षा विमान पाडणे हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो, अशी इस्रायली सुरक्षा यंत्रणेची पूर्वनियोजित कार्यपद्धती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

भारतीय बॉक्सिंगची वाटचाल ४४व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर!

शेख हसीना यांना भारताने नाही, बांगलादेशच्या लष्करी विमानाने आणले

मात्र, विमान इस्रायलपासून सुमारे ४०० मैल अंतरावर असतानाच सौदी अरेबियाच्या दिशेने वळले. त्यामुळे इस्रायलने फायटर जेट्स मागे बोलावली. सौदी अरेबियानेही आपली लढाऊ विमाने तैनात केली होती. अखेर विमानाने सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा