29.1 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरराजकारणशेख हसीना यांना भारताने नाही, बांगलादेशच्या लष्करी विमानाने आणले

शेख हसीना यांना भारताने नाही, बांगलादेशच्या लष्करी विमानाने आणले

भारताच्या उच्चायुक्तांचा खुलासा

Google News Follow

Related

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतात आगमनाबाबत आणि त्यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीवर भारताच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा झाला आहे. ढाका येथे आयोजित ‘बे ऑफ बंगाल कन्व्हर्सेशन’दरम्यान भारताच्या उच्चायुक्तांनी स्पष्ट केले की, शेख हसीना यांना कोणत्याही भारतीय विमानाने किंवा भारतीय सैन्याने भारतात आणले नव्हते. त्या बांगलादेशच्या लष्करी विमानातून भारतात आल्या होत्या.

उच्चायुक्तांनी सांगितले की, ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून पायउतार झाले, त्यावेळी त्या अधिकृतपणे बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यामुळे त्यांना भारतात स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे कदाचित दुसरा पर्याय नव्हता. एक शेजारी देश म्हणून त्यांना स्वीकारणे हे आमचे कर्तव्य होते.

उच्चायुक्तांनी स्पष्ट केले की, शेख हसीना यांना भारतीय हवाई दल किंवा भारतीय भूदलाने भारतात आणले नव्हते. त्या बांगलादेशच्या लष्करी विमानातून भारतात आल्या होत्या. भारताने त्या विमानाला उतरण्याची परवानगी दिली नसती, तर परिस्थिती आणखी वेगळी आणि गंभीर होऊ शकली असती. कारण भारतीय अधिकारी अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी तयार नव्हते.

हे ही वाचा:

पाक गुप्तहेराला लष्करी माहिती देणारा नौदलाचा जवान गजाआड

शहीदपत्नी प्रियांका सक्सेना पुन्हा भारतीय हवाई दलात रुजू

पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला; AK-47 सह हँड ग्रेनेड जप्त

बांगलादेशात दुर्गापूजेपूर्वी मंदिरावर हल्ला; ७ मूर्तींची तोडफोड

दरम्यान, बांगलादेशकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली असून, यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. या प्रकरणात न्यायालयांचा सहभाग असल्याने त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत आणि बांगलादेशचे संबंध हे कोणत्याही तिसऱ्या देशासोबत असलेल्या त्यांच्या संबंधांवर अवलंबून नसल्याचेही उच्चायुक्तांनी अधोरेखित केले. दोन्ही देशांना आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. परस्पर संवाद आणि विश्वासाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा