29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरराजकारणस्मित माछर, पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंनी दिले आमंत्रण

स्मित माछर, पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंनी दिले आमंत्रण

‘जगाचा हिरो’ म्हणत केले कौतुक

Google News Follow

Related

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात झालेला जीवघेणा हल्ला आपल्या धाडसाने आणि प्रसंगावधानाने परतवून लावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी माछरशी संवाद साधून त्याचे कौतुक केलेच पण त्यांना इस्रायलमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.

कॅप्टन स्मित यांच्या या धाडसाने प्रभावित झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना ‘जगाचा हिरो’ असे संबोधले आहे. तसेच कॅप्टन स्मित आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दोघांना मशाल प्रज्वलित करण्यासाठीही आमंत्रित करण्यात आले आहे.

यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी शनिवारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३८ वर्षीय कॅप्टन स्मित यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बुधवारी ‘फ्लायदुबई’चे एफझेड१०७३ हे विमान १७४ प्रवाशांना घेऊन इस्रायलकडे रवाना झाले होते. विमानात ओमानचा नागरिक हमम अल-हम्मामी हा सहवैमानिक म्हणून कार्यरत होता.

हे ही वाचा:

शेख हसीना यांना भारताने नाही, बांगलादेशच्या लष्करी विमानाने आणले

रशियन तेलाच्या आयातीवर भारत ठाम

आंदोलनजीवी दिपकेची जरांगे होण्याची प्रक्रिया सुरू…

ओवैसींनी केले स्मितचे कौतुक, पण ठाकरे थंडच!

प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. सहवैमानिकाने अचानक कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला केला. मात्र, या गंभीर परिस्थितीतही कॅप्टन स्मित यांनी प्रसंगावधान राखत विमानावरील नियंत्रण कायम ठेवले. पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संवादात कॅप्टन स्मित यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यादरम्यानही कॅप्टन स्मित यांनी आपला संयम गमावला नाही. त्यांनी विमानावरील नियंत्रण कायम ठेवत आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. विमान सुमारे ३४ हजार फूट उंचीवर असताना त्याला आपत्कालीन परिस्थितीत खाली आणण्यात आले. विमानाने वेगाने उंची कमी करत १७ हजार फुटांहून अधिक खाली उतरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि अखेर सौदी अरेबियामध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा