30.2 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरराजकारणविधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

पुणे-नागपूरमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे, तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिल्यानंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला आता वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना संधी देण्यात आली आहे. या जागेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये चर्चा सुरू होती. अखेर भाजपने या मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
हे ही वाचा:
भारतीय बॉक्सिंगची वाटचाल ४४व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर!

गोल्फमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या प्रणवीला १० लाखांचे इनाम

‘विंडीजविरुद्ध मालिका जिंकणे ही टीम इंडियाची प्राथमिकता’

शेतात राबणार रोबोट्स, ड्रोन
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. तीन उमेदवारांच्या घोषणेमुळे भाजपने या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली असून आता अन्य राजकीय पक्ष कोणाला मैदानात उतरवतात, याकडे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या घोषणा आणि राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. परिणामी पुणे आणि नागपूरसह संबंधित मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा