28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सस्मृतीच्या हाती ‘टीम इंडिया’ची कमान

स्मृतीच्या हाती ‘टीम इंडिया’ची कमान

Google News Follow

भारतीय महिला क्रिकेटमध्ये आता नव्या पर्वाची नांदी झाली आहे. मैदानावर आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेणारी स्मृती मंधाना आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. बीसीसीआयने स्मृती मंधानाची नव्या कर्णधारपदी अधिकृत घोषणा केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघाच्या फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या मंधानाच्या खांद्यावर आता नेतृत्वाची जबाबदारीही आली आहे. २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंधानाने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीसोबतच नेतृत्वगुणांचीही वेळोवेळी झलक दाखवली आहे. त्यामुळे तिच्याकडे सोपवण्यात आलेली ही जबाबदारी केवळ बदल नसून भारतीय महिला क्रिकेटच्या पुढच्या वाटचालीची नवी दिशा मानली जात आहे.

स्मृतीच्या नेतृत्वाची खरी परीक्षा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आधीच झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तिने २०२४ आणि २०२६ मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले. दोन विजेतेपदांनी तिच्या नेतृत्वक्षमतेवर शिक्कामोर्तब केले.

भारतीय संघासाठीही मंधाना यापूर्वी नेतृत्वाची भूमिका बजावत आली आहे. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत तिने १८ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि ४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघाची सूत्रे हाती घेताना ती पूर्णपणे नवखी नाही.

हरमनप्रीतचा भावनिक निरोप

मंधानाच्या नियुक्तीपूर्वी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. जड अंतःकरणाने कर्णधारपदाला निरोप देताना हरमनप्रीतने मात्र खेळाडू म्हणून भारतासाठी आपली सेवा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेटने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. आता तिच्यानंतर मंधानाच्या खांद्यावर संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आली आहे.

कर्णधारपदाची घोषणा झाल्यानंतर मंधानाने या जबाबदारीबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.

“भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मानाचा क्षण आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नेहमीच विशेष राहिले आहे. आता संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे,” असे मंधानाने सांगितले.

या नव्या भूमिकेत संघातील सहकाऱ्यांसोबत शिकण्याची आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याची उत्सुकताही तिने व्यक्त केली.

मंधानाने माजी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. “हरमनप्रीतने पूर्ण निष्ठेने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तिचे योगदान कायम महत्त्वाचे राहील,” असे सांगत मंधानाने तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा