28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरस्पोर्ट्सआयसीसी रँकिंगमध्ये भारताचा डंका

आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा डंका

Google News Follow

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये केलेल्या दमदार फलंदाजीचा मोठा फायदा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे टी-२० आणि वनडेच्या टॉप-१०मध्ये स्थान मिळवले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरने आपल्या कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक झळकावले. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर अय्यरने अवघ्या ४२ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने ४३ चेंडूंत नाबाद १०२ धावांची तुफानी खेळी केली.

या शतकाचा थेट फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला. अय्यरने तब्बल १८ स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले.

टी-२० क्रमवारीत ईशान किशन पहिल्या, अभिषेक शर्मा दुसऱ्या आणि पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर हॅरी ब्रूक, जोस बटलर, डेवाल्ड ब्रेविस आणि श्रेयस अय्यर यांचा क्रमांक लागतो. फिल सॉल्ट, पाथुम निसांका आणि तिलक वर्मा यांना प्रत्येकी एका स्थानाचा फटका बसला आहे.

वनडे क्रमवारीत केएल राहुलने तब्बल सात स्थानांची झेप घेत थेट दहावे स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत राहुलने ८७ चेंडूंत नाबाद १२९ धावांची वादळी खेळी केली होती. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

राहुलच्या या शानदार खेळीचे बक्षीस त्याला ताज्या आयसीसी क्रमवारीत मिळाले आहे.

वनडे क्रमवारीत भारताचा कर्णधार शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल दुसऱ्या, विराट कोहली तिसऱ्या, रोहित शर्मा चौथ्या आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान पाचव्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान मिळवले आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत होपने नाबाद १६२ धावांची निर्णायक खेळी केली होती.

पाकिस्तानचा बाबर आझम सातव्या, श्रीलंकेचा कुसाल मेंडिस आठव्या आणि इंग्लंडचा जो रूट नवव्या स्थानी आहे. त्यानंतर केएल राहुल दहाव्या क्रमांकावर आहे.

टॉप-१०मध्ये भारताची मजबूत उपस्थिती

श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या दमदार कामगिरीमुळे टी-२० आणि वनडे दोन्ही क्रमवारीत भारताच्या फलंदाजांची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. एका बाजूला श्रेयसने शतकाच्या जोरावर १८ स्थानांची झेप घेतली, तर राहुलने नाबाद १२९ धावांच्या खेळीने सात स्थानांची मजल मारली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा