29 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरस्पोर्ट्सआगरकर हटले अन् भुवनेश्वर कुमारचे ‘कमबॅक’!

आगरकर हटले अन् भुवनेश्वर कुमारचे ‘कमबॅक’!

Google News Follow

Related

टीम इंडियाच्या निवड समितीत झालेल्या बदलाचा थेट फायदा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला झाला आहे. माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळात रखडलेले भुवनेश्वरचे पुनरागमन, त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर अखेर शक्य झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञान ओझा याच्या नेतृत्वाखालील नव्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला असून, त्यात भुवनेश्वर कुमारचा समावेश हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

भुवनेश्वरच्या पुनरागमनाची मागणी चाहत्यांकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मात्र, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा युवा गोलंदाजांना अधिकाधिक संधी देण्यावर भर असल्याने भुवनेश्वरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होत नव्हता, असे एका अहवालात म्हटले आहे.

आगरकरचा विरोध?

निवड समितीतील माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंह यांनी भुवनेश्वरच्या पुनरागमनासाठी अनेकदा बाजू मांडली होती. मात्र, मुख्य निवडकर्त्यांचा पाठिंबा मिळत नसल्याने त्याची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकली नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

आगरकर पदावरून दूर झाल्यानंतर बीसीसीआयने प्रज्ञान ओझा याच्याकडे अंतरिम निवड समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. ओझा यांनी भुवनेश्वरच्या अनुभवावर विश्वास दाखवत त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान दिले.

४ वर्षांनी टीम इंडियात

३६ वर्षीय भुवनेश्वर कुमार जवळपास ४ वर्षांनंतर भारतीय संघात परतला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ९० विकेट, १२१ वनडेत १४१ विकेट आणि २१ कसोटीत ६३ विकेट घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे, त्याचे पुनरागमन केवळ जुन्या कामगिरीच्या जोरावर झालेले नाही. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर भुवनेश्वर कुमार हा भारतीय गोलंदाजीतील सर्वात अनुभवी चेहरा असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा