29.1 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषबकऱ्यांना विरोध केल्यामुळे मिरारोडच्या त्या सोसायटीत नवरात्रोत्सवाला मनाई

बकऱ्यांना विरोध केल्यामुळे मिरारोडच्या त्या सोसायटीत नवरात्रोत्सवाला मनाई

रहिवाशांची नाराजी

Google News Follow

मिरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये नवरात्रोत्सवाच्या परवानगीवरून वाद निर्माण झाला आहे. नियमांचे पालन करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याची तयारी असतानाही सोसायटीने परवानगी नाकारल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीतील सुमारे १२० कुटुंबांनी ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी मागितली होती. कार्यक्रमासाठी आवश्यक सुरक्षा, स्वच्छता तसेच सोसायटीचे नियम आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची हमी रहिवाशांनी दिली होती. मात्र, त्यानंतरही कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये सुमारे ६२५ सदनिका असून विविध धर्मांचे नागरिक वास्तव्यास आहेत. २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सामायिक जागेत अशा प्रकारचे सामुदायिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले. मात्र, रहिवाशांकडून सर्व नियम आणि अटी मान्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली असतानाही त्यांची मागणी विचारात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात रहिवासी उमाशंकर नाग यांनी तक्रार दाखल केली असून, सण साजरा करण्यासाठी नियमांचे पालन करण्याची तयारी असताना सोसायटीने एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘तेजस’साठी अमेरिकेतून चार इंजिन भारतात दाखल

स्मृतीच्या हाती ‘टीम इंडिया’ची कमान

आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा डंका

पेनल्टीवर अखेरची मोहोर; मेस्सीचा भावुक अलविदा!

दरम्यान, सोसायटी पदाधिकारी रूपा पिंटो, दानिश शेख आणि मिनाज शेख यांनी सोसायटीची बाजू मांडली आहे. कोणत्याही धर्माच्या सणाला सोसायटीचा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यापूर्वी बकरी ईदच्या काळात याच परिसरात बकऱ्या आणण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत सामुदायिक कार्यक्रमांबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्याचीच अंमलबजावणी केली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाची परवानगी नाकारण्यामागे कोणताही धार्मिक भेदभाव नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र, नियम पाळण्याची तयारी दाखवूनही नवरात्रोत्सवाला परवानगी नाकारली जात असल्याने रहिवाशांचा आक्षेप अधिक तीव्र झाला आहे. त्यांच्या मते, कार्यक्रम शांततेत पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही थेट परवानगी नाकारण्याऐवजी अटी आणि नियम ठरवून कार्यक्रमाला परवानगी देता आली असती. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ नवरात्रोत्सवापुरता मर्यादित न राहता सोसायटीचे नियम, सामायिक जागेचा वापर आणि रहिवाशांना सण साजरा करण्याची संधी या मुद्द्यांशी जोडला गेला आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाहीकडे पूनम क्लस्टरमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा