32 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरविशेषनोएडा विमानतळाचे नाव ‘नरेंद्र मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ’

नोएडा विमानतळाचे नाव ‘नरेंद्र मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ’

योगी सरकारच्या मंत्रिमंडळाची मंजुरी

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जेवर येथे निर्माणाधीन असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (९ ऑक्टोबर) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विमानतळाचे नाव ‘नरेंद्र मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांचा कालखंड देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांचे उत्तर प्रदेशशी जिव्हाळ्याचे नाते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाची नवी शिखरे गाठत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधानांनी सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण हे आपले ध्येय मानले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत झाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी म्हणजे ५०० वर्षांची प्रतीक्षा संपल्याचे उदाहरण असल्याचे नमूद करत त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरची निर्मिती आणि परदेशातून माँ अन्नपूर्णा यांची मूर्ती परत आणून तिची पुनर्स्थापना करण्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

हे ही वाचा:

१० ऑक्टोबरच्या कॉकरोचच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

२ ऑक्टोबरपासून दिल्ली पोलिसांकडून २५ एफआयआर

गोदावरी नदीकाठावरील अनधिकृत मजार हटवली

फेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च २०२६ रोजी या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्चून ३,३०० एकर क्षेत्रावर टर्मिनल आणि धावपट्टी विकसित करण्यात आली आहे. या टप्प्यात विमानतळाची सुरुवातीची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे १.२ कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पाचे चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाचा आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांमध्ये समावेश करण्याचे नियोजन आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा