28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरदेश दुनियाफेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड

फेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड

आईची दयेची याचना

Google News Follow

फेसबुकवरील एका कमेंटमुळे श्रीलंकेतील २४ वर्षीय हिंदू तरुण सिवरासा अणोजन याला सौदी अरेबियात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याला सुरुवातीला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ३० लाख सौदी रियालचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, सरकारी पक्षाच्या अपीलनंतर त्याची शिक्षा मृत्युदंडात बदलण्यात आली. आता त्याच्या कुटुंबीयांनी माफी देऊन मायदेशी परत पाठवण्याची विनंती केली आहे.

अणोजन हा श्रीलंकेच्या पूर्वेकडील कालमुनाई परिसरातील रहिवासी असून, रोजगारासाठी सौदी अरेबियात गेला होता. या प्रकरणाची सुरुवात श्रीलंकेत हिंदू धार्मिक यात्रेदरम्यान एका कुत्र्याला मुस्लिम व्यक्तीने लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली. यावरून समाजमाध्यमांवर धार्मिक वाद सुरू झाला. एका व्यक्तीने हिंदू देवतेविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर अणोजनने तमिळ भाषेत प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप आहे. त्याने ही कमेंट हटवून माफी मागणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला; मात्र, कमेंटचे स्क्रीनशॉट सौदीतील त्याच्या नियोक्त्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याला जुलैमध्ये अटक करण्यात आली.

२७ जुलै रोजी अल-अहसा फौजदारी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ३० लाख सौदी रियालचा दंड सुनावला. सरकारी पक्षाने अपील करत प्रकरण शरिया कायद्यानुसार चालवण्याची मागणी केली. १७ सप्टेंबर रोजी अपील न्यायालयाने शिक्षा मृत्युदंडात बदलली.

हे ही वाचा:

काँग्रेसची डबल ढोलकी! फडणवीसांनी जुना व्हिडिओ दाखवत घेरले

स्मित माछर यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

पाकिस्तानचा नकाशा बदलणार? चार प्रांतांच्या विभाजनाचा प्रस्ताव

‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा जगभरात डंका

अणोजनची आई रसमणिक्कम योगलक्ष्मी यांनी मुलाला माफ करून श्रीलंकेत परत पाठवण्याचे आवाहन केले आहे. २८ सप्टेंबरपासून कुटुंबाचा त्याच्याशी संपर्क झालेला नाही. त्याच्या भावाने श्रीलंकेच्या दूतावासाशी संपर्क साधला आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुर कुमार दिसानायके यांनी २१ सप्टेंबर रोजी अणोजनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सौदी नेतृत्वाकडे दयेची विनंती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या सुटकेसाठी कायदेशीर आणि राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा