33 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरविशेषछत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रॉयल बेकरीचा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रॉयल बेकरीचा परवाना निलंबित

कप केकमध्ये रबराचे तुकडे

Google News Follow

Related

छत्रपती संभाजीनगरमध्ये कप केकमध्ये रबर आणि प्लास्टिकचे तुकडे आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने रॉयल बेकरीवर कारवाई केली आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीत तयार होणाऱ्या कप केकमध्ये परकीय पदार्थ आढळल्याची तक्रार ग्राहकाने केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने बेकरीच्या उत्पादन केंद्राची तपासणी केली. त्यावेळी अन्नपदार्थांच्या निर्मिती प्रक्रियेत स्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने बेकरीचा अन्न परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या अचानक तपासणीत बेकरी परिसरात अस्वच्छता, उघड्यावर कचरा आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आढळला. खिडक्या आणि दरवाजांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नव्हत्या. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या व लसीकरणाच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. तसेच कामगारांकडून हातमोजे, ॲप्रन आणि डोक्याचे संरक्षण करणाऱ्या साधनांचा वापर केला जात नसल्याचे तपासणीत समोर आले.
हे ही वाचा:
फ्लायदुबई विमानातील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे

उपद्रवी कॉक्रोच आंदोलनावर सरकारचा कारवाईचा बडगा

इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवा!

विश्वचषकासाठी रोहित-विराटचा फॉर्म निर्णायक!

बेकरीत अन्नपदार्थांच्या पुनर्पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य अन्नसुरक्षेच्या निकषांनुसार नसल्याचे, तसेच वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या आणि तयार अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त दयानंद पाटील यांनी ८ ऑक्टोबरपासून बेकरीचा अन्न परवाना निलंबित केला. सर्व त्रुटी दूर करून प्रशासनाची लेखी परवानगी मिळेपर्यंत उत्पादन आणि विक्री सुरू करता येणार नाही. या घटनेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी, उत्पादनातील स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा