28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन झाले आहे. पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. लावणी, लोकनाट्य, चित्रपट आणि रंगभूमी अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. बालपणापासूनच त्यांना नृत्य आणि लोककलेची आवड होती. त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या सादरीकरणातून त्यांनी महाराष्ट्रभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. पारंपरिक लावणीतील अदाकारी, सहज अभिनय आणि प्रभावी हावभाव यांमुळे त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविध स्वरूपाच्या भूमिका साकारल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघू मैना’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. चित्रपटांपुरता त्यांचा कलाप्रवास मर्यादित नव्हता. लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मनोरंजनविश्वात योगदान दिले.

हे ही वाचा:

खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी; इम्रान यांच्या पक्षाचे नेते अटकेत

भेटू नका, न्यायालयात याचिका दाखल करा!

होर्मुझचा तिढा सुटेना! अमेरिकेचा प्रस्ताव इराणने नाकारला

उदयवीर सिद्धूची सुवर्णकामगिरी

मधू कांबीकर यांनी केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर लावणी कलावंत म्हणूनही स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस येथेही झाले. त्यांच्या कलाप्रवासामुळे लावणी आणि मराठी लोककलेला व्यापक ओळख मिळाली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा