29.4 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरराजकारणकुठे आहे हुकुमशाही... ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना चहा, समोसे

कुठे आहे हुकुमशाही… ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना चहा, समोसे

दिल्लीत झालेल्या आंदोलनावेळी केली होती कारवाई

Google News Follow

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या आंदोलनात मोदी सरकारच्या कथित हुकुमशाहीच्या घोषणा देण्यात आल्या मात्र या व्हीडिओतून वेगळेच वास्तव समोर येताना दिसले. मात्र, या व्हिडिओंनी केवळ अटकेमुळेच नव्हे, तर पोलिसांनी आंदोलकांसाठी केलेल्या विशेष व्यवस्थेमुळेही लक्ष वेधून घेतले आहे. आंदोलकांना ज्या बावाना स्टेडियममध्ये नेण्यात आले, तेथे दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासाठी चहा, समोसे आणि पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली. तसेच, त्यांना घरी परतण्यासाठी वाहतुकीची मदतही केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावाना स्टेडियममध्ये या व्यवस्थेची जबाबदारी २०२४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आणि एसीपी गौरव यांनी सांभाळली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना अल्पोपाहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

महिला आंदोलक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रिठाळा मेट्रो स्थानकापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. तर पुरुष आंदोलकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बस उपलब्ध करून देण्यात आल्या.

हे ही वाचा:

काँग्रेस खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

जंतर मंतर आता छू मंतर

“लोकशाहीला सचोटीची गरज, निवडक संतापाची नाही”

‘एक चाय, दो समोसा, दिल्ली पोलिसांवर पूर्ण भरोसा!’

पोलिसांनी केलेल्या या व्यवस्थेमुळे आंदोलनस्थळी काही हलकेफुलके घोषणाही ऐकायला मिळाले. काही आंदोलकांनी, ‘एक चाय, दो समोसा, दिल्ली पोलिसांवर पूर्ण भरोसा!’ अशी घोषणा दिली. त्याचा अर्थ, एक चहा, दोन समोसे आणि दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास, असा होतो.

‘लोकशाहीचे कराल रक्षण, दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास!’ अशी घोषणाही आंदोलकांनी दिली. आंदोलनाच्या गंभीर वातावरणात पोलिसांनी केलेल्या अल्पोपाहाराच्या व्यवस्थेमुळे आणि आंदोलकांना घरी जाण्यासाठी केलेल्या मदतीमुळे या घोषणांनी लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान यूट्यूबर निखिल वर्मा, ज्याला ‘छोटा चेतन’ या नावाने ओळखले जाते, त्याला रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (आरएएफ) जवानाने उचलून नेल्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील दोघांमधील संवादामुळे त्याची विशेष चर्चा होत आहे. या यूट्यूबरला ताब्यात घेताना जवानाने दाखवलेली सहज आणि सौम्य वागणूक तसेच दोघांमधील अनौपचारिक संभाषण यामुळे समाजमाध्यमांवरील काही वापरकर्त्यांनी या संवादाला ‘पूकी’ असे म्हटले. इंटरनेटवरील भाषेत एखाद्या व्यक्तीचे प्रेमळ, गोड किंवा आपुलकीचे वर्तन वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.

निखिलने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो कनॉट प्लेसच्या रस्त्यांवरून धावताना दिसतो. पोलिस कर्मचारी त्याचा पाठलाग करतात. त्यानंतर रॅपिड ॲक्शन फोर्सचा एक जवान त्याला पकडतो, उचलतो आणि तेथून घेऊन जातो. या वेळी निखिल सहजपणे म्हणतो, “अखेर पोलिसांनी पकडलेच!”त्यावर जवानही त्याला हलक्याफुलक्या शैलीत विचारतो, “तू खूप व्हायरल होत आहेस ना?”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा