28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषजंतर मंतर आता छू मंतर

जंतर मंतर आता छू मंतर

यापुढे आंदोलनांसाठी बंदी, नवी तीन स्थळे जाहीर

Google News Follow

दिल्लीतील आंदोलनांसाठीचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंतरमंतरला आता अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश जारी केला. यापुढे आंदोलन आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांना आंदोलने आणि निदर्शने आयोजित करता यावीत यासाठी पर्यायी ठिकाणांचा अभ्यास करण्याकरिता एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतरमंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जंतरमंतरऐवजी आता रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान येथे आंदोलनांना अधिकृत मान्यता असेल. या ठिकाणी आंदोलन किंवा निदर्शने आयोजित करण्यासाठी कोणती प्रक्रिया पाळावी लागेल, याबाबतची सुधारित नियमावली (एसओपी) स्वतंत्रपणे जारी केली जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा आदेश २८ एप्रिल २०२२ रोजीच्या जुन्या आदेशात अंशतः बदल करणारा आहे.

हे ही वाचा:

शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंविरोधात गुन्हा

एमपीएससी चौकशीसाठी समिती; तुकाराम मुंढेंकडे महत्त्वाची जबाबदारी

“लोकशाहीला सचोटीची गरज, निवडक संतापाची नाही”

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

दिल्लीतील आंदोलनस्थळ बदलण्याचा मुद्दा अलीकडेच सर्वोच्च न्यायालयातही उपस्थित झाला होता. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, शांततापूर्ण आंदोलनांसाठी अधिक योग्य आणि आवश्यक सुविधांनी युक्त पर्यायी जागा निश्चित करण्याचा विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित यंत्रणांना दिले होते. आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वैद्यकीय सुविधांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध असाव्यात, यावरही न्यायालयाने भर दिला होता. दिल्लीतील जंतरमंतर हे अनेक वर्षांपासून राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आता या ठिकाणाला अधिकृत आंदोलनस्थळाचा दर्जा नसल्याने राजधानीतील आंदोलनांचे नियोजन नव्या ठिकाणांनुसार करावे लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा