28.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरराजकारण'कैसा हराया' चे वडील शिंदे सेनेत

‘कैसा हराया’ चे वडील शिंदे सेनेत

एमआयएममध्येच असल्याचा युनूस शेख यांचा दावा

Google News Follow

ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर ‘कैसा हराया’ या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची कळवा-मुंब्रा ‘केबल सेना’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने झाल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. मात्र, युनूस शेख यांनी आपण एमआयएममध्येच असल्याचा दावा केल्याने या घडामोडीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर विजय मिळवला होता. निवडणुकीनंतरच्या विजयी सभेत त्यांनी ‘कैसा हराया’ असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. तसेच, संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या.

युनूस शेख यांची शिंदे सेनेच्या अखिल भारतीय केबल सेना, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करत असल्याचे त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्यासंदर्भातील छायाचित्रही समोर आले आहे. मात्र, युनूस शेख यांनी आपण एमआयएममध्येच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत आणि राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

युनूस शेख यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, आपण कुठल्याही पक्षात नाही. मुलगी नगरसेविका असून आपण समाजसेवा करत असतो. २७ वर्ष एनसीपीत होतो. आता समाजसेवक म्हणून काम करतो. शिंदे सेनेची संघटना असलेल्या केबल सेना यामध्ये पद मिळाले आहे. तसेच आपल्या वडिलांपासून केबल व्यवसाय असून अखिल भारतीय केबल सेना हा पक्ष नाही, ती संघटना आहे. त्याचा आधीपासून सदस्य होतो. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या सोडवतो. ही संघटना शिंदे सेनेची असली तरी मी लोकांसाठी काम करतो.

 ही वाचा:

शत्रूच्या ड्रोनला रोखणार, गरज पडल्यास हल्लाही करणार!

धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ आपोआप मिळणार नाही!

आठ वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून ध्रुव राठीला समन्स

पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात गुन्हा

सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक होते. मात्र, नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. महापालिका निवडणुकीत सहर शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर बाप-लेकीने आव्हाड यांच्यावर टीका केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा