29.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामाआठ वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून ध्रुव राठीला समन्स

आठ वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून ध्रुव राठीला समन्स

१७ ऑक्टोबरला सुनावणी

Google News Follow

यूट्यूबर ध्रुव राठी हा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी भारतात आला होता. दरम्यान त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ध्रुव राठी याला २०१८ मधील कथित फौजदारी मानहानी प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. भाजपच्या आयटी सेलशी संबंधित विकास संकृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. न्यायिक दंडाधिकारी राहुल जैन यांच्या न्यायालयाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश दिला असून, पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार आहे.

ध्रुव राठी गेल्या काही वर्षांपासून परदेशात वास्तव्यास असल्याने त्याला समन्स बजावण्यात अडचणी आल्याचे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. यापूर्वी २३ जुलै २०१९ रोजी समन्स जारी करण्यात आले होते. राठी सध्या भारतात असल्याने गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील पत्त्यावर नव्याने समन्स बजावण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने नियमित समन्ससोबत दस्ती समन्सलाही परवानगी दिली असून, आवश्यक प्रक्रिया शुल्क दोन दिवसांत भरण्याचे निर्देश दिले.

काय आहे प्रकरण?

मे २०१८ मध्ये ध्रुव राठीने ‘BJP IT Cell Part 2’ हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ‘I Support Narendra Modi’ या सोशल मीडिया पेजचे संचालक विकास पांडे यांच्याबाबत व्हिडीओमध्ये आरोप करण्यात आले होते. भाजपच्या आयटी सेलविरोधात खोट्या बातम्या पसरवल्याचे आरोप मागे घेण्यासाठी महावीर प्रसाद यांना ५० लाख रुपयांची कथित ऑफर दिल्याचा दावाही या वादाशी संबंधित होता. या आरोपांमुळे बदनामी झाल्याचे सांगत पांडे यांनी फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

इम्रान खान भारत छोडो!

पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात गुन्हा

“स्टारलिंक युद्धाचे साधन” उपग्रह इंटरनेट इराणच्या रडारवर

मेट्रो निर्बंधांपासून सुरक्षा व्यवस्थेपर्यंत; दिल्ली पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबंधित पोस्ट रीट्वीट केल्याने त्यांच्याविरोधातही तक्रार झाली होती. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. फेब्रुवारी २०२४ मध्ये केजरीवाल यांच्या वकिलांनी रीट्वीट करणे ही चूक असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा