28.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामासुरतमध्ये मेडिकल जिहाद; मुलांना दिले जात होते जनावरांचे सप्लिमेंट

सुरतमध्ये मेडिकल जिहाद; मुलांना दिले जात होते जनावरांचे सप्लिमेंट

साजिद मुल्ला श्री शांतिनाथ मेडिकलमधून करत होता कारवाया

Google News Follow

गुजरातमधील सुरत येथे मेडिकल जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जनावरांसाठीचे लिक्विड फीड सप्लिमेंट लहान मुलांच्या औषधाच्या नावाखाली विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्री शांतिनाथ मेडिकल स्टोअरचा संचालक मोहम्मद साजिद इब्राहिम मुल्ला (५१) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने जनावरांसाठीच्या सप्लिमेंटच्या बाटल्यांवर ‘हिमालया लिव्ह ५२ ड्रॉप्स’चे बनावट लेबल लावून विक्री केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरात अशा सुमारे १,००० बाटल्यांची विक्री झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरतच्या गोपीपुरा परिसरातील या मेडिकल स्टोअरमध्ये जनावरांसाठीचे उत्पादन मानवी वापरासाठी विकले जात असल्याची माहिती विशेष अभियान गटाला (एसओजी) मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी दुकानावर छापा टाकला आणि संचालकाला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे ‘हिमालया लिव्ह ५२ प्रोटेक लिक्विड व्हेटरिनरी फीड सप्लिमेंट’चे एक आणि पाच लिटरचे कॅन होते. त्यातील द्रव ६० मिली आणि १०० मिलीच्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर मुलांसाठीच्या ‘हिमालया लिव्ह ५२ ड्रॉप्स’चे बनावट लेबल लावले जात होते. हे उत्पादन मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट दराने विकल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा:

तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांनी दिपकेची गठडी वळली

तिरंगा यात्रेपूर्वी अभिजित दिपकेला नोटीस

“निवडणूक सुधारणांचा नव्हे, सत्ता बळकावण्याचा कट”

डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

या कारवाईत पोलिसांनी सप्लिमेंटचे कॅन, लेबल लावलेल्या बाटल्या आणि अन्य साहित्य असा एकूण ३१,१९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, १२५, ३३६ आणि २७८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना हे उत्पादन दिले गेले होते का आणि त्याच्या विक्रीचे जाळे किती व्यापक आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना औषधे खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा