29.2 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामाहिंदू व्यापाऱ्यांना नग्न व्हीडिओ दाखवून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या नाझीयाला अटक

हिंदू व्यापाऱ्यांना नग्न व्हीडिओ दाखवून ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या नाझीयाला अटक

कुर्ल्यातील व्यवसायिकाच्या मॅनेजरकडून चार कोटी उकळले

Google News Follow

हिंदू व्यवसायिकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ‘न्यूड अवस्थेत’ व्हिडीओ कॉल करून ब्लॅकमेल करणाऱ्या नाझीया उर्फ नाझमीन शेखला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने घाटकोपर येथून अटक केली आहे. नाझीयाने कुर्ल्यातील एका ज्वेलर्स दुकानातील मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कॉल रेकॉर्डिंग पोलिस, न्यायाधीश आणि अन्य यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत एका ६१ तब्बल चार कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाझिया मेहमूद शेख ऊर्फ नाझनीन (४५) हिला पाच लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी पकडले.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार हे घाटकोपर पूर्व येथे कुटुंबासह राहतात. ते कुर्ला परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. या दुकानात २०२० मध्ये दागिने खरेदीसाठी आलेल्या नाझिया शेख हिच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून संपर्क सुरू झाला. नाझिया हिने आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगितल्याने तक्रारदार यांनी मार्च ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तिला टप्प्याटप्प्याने सुमारे दहा लाख रुपये दिले होते.

त्यानंतर डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान नाझिया हिने तक्रारदार यांना व्हिडीओ कॉल केला. या कॉलचे रेकॉर्डिंग झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी तिने त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला. पुढे या रेकॉर्डिंगचा वापर करून तक्रारदार यांना बदनामीची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्याचे आणि ते इंटरनेटवर प्रसारित होऊ नये यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे नाझिया हिने सांगितल्याचा आरोप आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये बदनामी होण्याच्या भीतीने तक्रारदार यांनी तिच्या मागण्या मान्य केल्या. त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने वितळवून मिळालेली तीन लाख रुपयांची रक्कम तसेच दुकानातील अन्य तीन लाख रुपये काढून तिला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हे ही वाचा:

अधारिका फाउंडेशनच्या ‘नवदुर्गा पुरस्कारां’नी नऊ दृष्टिहीन महिलांचा गौरव

सौदीत गरबा सादर केल्याबद्दल भारतीय मुस्लिम महिलेची चरफड

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

बांगलादेशचे माजी हवाई दलप्रमुख कतारमध्ये अटकेत

त्यानंतरही नाझिया हिने कथित कॉल रेकॉर्डिंग डिलीट करण्यासाठी किंवा त्याचा प्रसार रोखण्यासाठी न्यायालयीन आणि अन्य अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, अशी कारणे सांगून वारंवार पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत तक्रारदार यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन माध्यमातून सुमारे चार कोटी रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

१० ऑगस्ट २०२६ रोजी आणखी सहा लाख रुपये देण्यासाठी भेट झाली असता, यापुढे पैसे न दिल्यास हात-पाय तोडून टाकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत आणखी १५ लाख रुपये न दिल्यास घर आणि कामाच्या ठिकाणी पोलिस पाठवून बदनामी करण्याची तसेच कथित रेकॉर्डिंग इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

सततच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी गुन्हे शाखा कक्ष सात, घाटकोपर येथे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. तक्रारदाराने आरोपी महिलेला घाटकोपर पश्चिम येथील एल.बी.एस. मार्गावर राधाकृष्ण हॉटेलजवळ पैसे देण्याचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे १८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता नाझिया तेथे आली. तिने कथित रेकॉर्डिंगचा प्रसार रोखण्यासाठी एकूण १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताच तक्रारदाराने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिस पथकाने कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा