29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषटायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

कारवाईचे आश्वासन

Google News Follow

मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना आरोपींचे धागेदोरे सापडले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने तपास सुरू केला असून, गोळीबार करणारे आरोपी कोण आहेत आणि त्यांच्यामागे कोणत्या व्यक्ती किंवा यंत्रणा आहेत, याचाही शोध घेतला जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात गोळीबार करण्यात आला. फुटबॉल खेळून घरी परतत असताना त्याच्या कारला लक्ष्य करण्यात आले. या घटनेत टायगर सुरक्षित बचावला; मात्र त्याचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. कारवर गोळीबाराच्या वेळी पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आरोपींचे धागेदोरे मिळाले असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना सहन केल्या जाणार नाहीत. संबंधित आरोपी हे भाड्याने काम करणारे लोक असून, त्यांना दुसरीकडून पाठबळ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. काही गुन्हेगार महाराष्ट्राबाहेरून आणि देशाबाहेरून कार्यरत असल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. मात्र, केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांशी समन्वय साधून अशा टोळ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

बांगलादेशचे माजी हवाई दलप्रमुख कतारमध्ये अटकेत

इतना सन्नाटा क्यू है? ही आहेत चार कारणं |

या घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. टायगर श्रॉफला सुरक्षा पुरवण्यात आली आहे; मात्र काही कारणांमुळे त्याने त्या वेळी आपले सुरक्षा कवच सोबत ठेवले नव्हते. त्याच वेळी त्याच्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील अधिक माहिती तपासातून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत, कलाकारांनी अशा टोळ्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. धमक्यांना सरकार आणि पोलीस गांभीर्याने घेत असून, आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांचाही शोध घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा