29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरदेश दुनियामॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना मुर्खात काढले

मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना मुर्खात काढले

फ्रान्समधील अशांततेवरून मॅक्रॉन-ट्रम्प यांच्यात जुंपली!

Google News Follow

फ्रान्समधील अशांततेचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या परदेशी नेत्यांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जोरदार टीका केली आहे. अशा नेत्यांची वक्तव्ये ‘जितकी मूर्खपणाची आहेत, तितकीच अस्वीकार्य’ असल्याचे त्यांनी म्हटले. बुधवारी कतार दौऱ्यावर असताना मॅक्रॉन यांनी ही प्रतिक्रिया दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून ही टीका आहे का, असे विचारले असता त्यांनी इतर नेत्यांकडेही बोट दाखवले. त्यामुळे त्यांचा निशाणा केवळ ट्रम्प यांच्यावर नसून इतर परदेशी नेत्यांवरही असल्याचे स्पष्ट झाले.

मॅक्रॉन यांनी काही नेत्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार केलेल्या बनावट प्रतिमांद्वारे चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. या प्रतिमांमध्ये फ्रान्समध्ये प्रत्यक्षात न घडलेल्या घटना दाखवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सवर स्थलांतरित आणि इस्लामिस्टांच्या टोळ्यांनी आक्रमण केल्याचे दावे खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील अशांततेचा वापर फ्रान्सच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आणि परदेशातील अंतर्गत राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

फ्रान्समधील हिंसाचाराचा संदर्भ देत ट्रम्प यांनी फ्रान्सच्या स्थलांतर धोरणावर निशाणा साधला होता. स्थलांतरित, जिहादी आणि कम्युनिस्टांमुळे फ्रान्समध्ये अस्थिरता निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांच्या स्थलांतरविषयक धोरणांचे परिणाम दाखवण्यासाठी फ्रान्समधील हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेखही त्यांनी केला. ट्रम्प यांच्या या भूमिकेला मॅक्रॉन यांनी आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा:

वाशीममध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून राडा

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

‘रामायण’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ४.८८ कोटींची कमाई

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हवा सोशल मीडियावर मंदावली?

फ्रान्समध्ये महागाई, वाढता राहणीमानाचा खर्च, सार्वजनिक सेवांमधील कपात आणि शैक्षणिक सुविधांबाबतच्या नाराजीमुळे आंदोलने सुरू आहेत. पॅरिस, मार्सेल आणि ल्योनसारख्या शहरांमध्ये काही निदर्शनांना हिंसक वळण लागले. जाळपोळ, लुटमार आणि पोलिसांशी चकमकींच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. फ्रान्सचे न्यायमंत्री ग्रॅल्ड डार्मानिन यांच्या माहितीनुसार, हिंसाचारानंतर २,५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. काही संशयितांवर खटला चालवण्यासाठी त्यांना न्यायालयीन प्रक्रियेकडे पाठवण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा