28.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हवा सोशल मीडियावर मंदावली?

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हवा सोशल मीडियावर मंदावली?

इन्स्टाग्राम एंगेजमेंटमध्ये ५८ टक्क्यांची घसरण

Google News Follow

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोशल मीडियावर किती प्रतिसाद मिळत आहे, याबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. जुलैमध्ये झालेल्या नीट आंदोलनाच्या तुलनेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या सीईसीविरोधी मोहिमेदरम्यान इन्स्टाग्रामवरील प्रति पोस्ट सरासरी एंगेजमेंटमध्ये तब्बल ५८ टक्क्यांची घट झाली. तर ‘एक्स’वरील सकारात्मक प्रतिक्रियांचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत घसरले. डेटाबिंग्सच्या विश्लेषणातून हे चित्र समोर आले आहे.

आकडेवारीनुसार, जुलै २०२६ मध्ये नीट आंदोलनादरम्यान संबंधित इन्स्टाग्राम खात्यावर २२९ पोस्ट करण्यात आल्या होत्या. या पोस्टना प्रति पोस्ट सरासरी ८ लाख ८२ हजार ४५९ एंगेजमेंट मिळाले. याउलट, २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान सीईसीविरोधी मोहिमेसाठी ९१ पोस्ट करण्यात आल्या. या पोस्टवरील प्रति पोस्ट सरासरी एंगेजमेंट ३ लाख ७१ हजार २०१ इतके राहिले. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील एंगेजमेंटमध्ये सुमारे ५८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

‘एक्स’वरील प्रतिक्रियांच्या विश्लेषणातूनही सकारात्मकतेत घट झाल्याचे दिसते. नीट आंदोलनादरम्यान पोस्टवरील टिप्पण्यांपैकी ३३ टक्के सकारात्मक, तर ६७ टक्के नकारात्मक होत्या. सीईसीविरोधी मोहिमेदरम्यान सकारात्मक प्रतिक्रियांचे प्रमाण १७ टक्क्यांवर आले, तर नकारात्मक प्रतिक्रियांचे प्रमाण वाढून ८३ टक्क्यांवर पोहोचले.

हे ही वाचा:

ज्ञानेशकुमार प्रकरणावर बोलण्यास रुबिओंचा स्पष्ट नकार

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची प्रतिमा डागाळू नका!

टायगर प्रकरणात दादर कनेक्शन…दोन तरुणीही कटात सामील

रुबिओंसमोर २६/११ च्या प्रत्यक्ष साक्षीतून पाकिस्तानस्थित दहशतवादाचे वास्तव!

मात्र, ‘एक्स’वरील एंगेजमेंटमध्ये घट झाली नाही. नीट आंदोलनादरम्यान प्रति पोस्ट सरासरी एंगेजमेंट ४ हजार ३७४ होते. सीईसीविरोधी मोहिमेदरम्यान ते वाढून ५ हजार ४४७ झाले. म्हणजेच, त्यात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, इन्स्टाग्रामवरील सकारात्मक टिप्पण्यांचे प्रमाण तुलनेने स्थिर राहिले. नीट आंदोलनादरम्यान ते ७७ टक्के होते, तर सीईसीविरोधी मोहिमेदरम्यान ७५ टक्के राहिले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा