30.7 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरविशेष“भाजप सत्तेत असेपर्यंत भारतात पाऊल ठेवणार नाही”

“भाजप सत्तेत असेपर्यंत भारतात पाऊल ठेवणार नाही”

वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकचे वक्तव्य

Google News Follow

मनी लाँड्रिंगच्या आरोपांसाठी भारतात वॉन्टेड असलेला आणि वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याने केंद्रात भाजपची सत्ता असेपर्यंत भारतात परतणार नसल्याचे म्हटल्याचा दावा ‘रिपब्लिक भारत’च्या स्टिंग ऑपरेशनमधून करण्यात आला आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे चित्रित केल्याचे सांगितलेल्या या संभाषणात झाकीरनाईकने काँग्रेसला सत्तेत पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही वृत्त आहे.

स्टिंग ऑपरेशनच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारतात परतल्यास आपल्याला अटक होऊ शकते किंवा पुन्हा परदेशात जाता येणार नाही, अशी भीती झाकीर नाईकने व्यक्त केली. भाजपची सत्ता गेल्यानंतरच भारतात परतण्याचा विचार करेन, असे त्याने म्हटल्याचा दावा आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल विचारले असता त्याने ‘राहुल बेहतर है’, असे उत्तर दिल्याचेही वृत्तात नमूद आहे.

काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता कमी असली, तरी आघाडी सरकारच्या माध्यमातून पक्षाने सत्तेत यावे, अशी भूमिका नाईकने मांडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनांबाबतही त्याने अनुकूल भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. तसेच ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)शी संबंधित आंदोलकांना आणि सत्ताबदलाच्या मागणीला त्याने पाठिंबा दिल्याचा दावा स्टिंगमध्ये करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले

सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले

“परदेशी नेत्यांची वक्तव्ये मूर्खपणाची, अस्वीकार्य”

वाशीममध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून राडा

२०१६ पासून भारताबाहेर

झाकीर नाईक हा २०१६ पासून भारताबाहेर असून मलेशियात वास्तव्यास आहे. तो मुंबईस्थित ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’चा प्रमुख होता. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) या संस्थेला बेकायदेशीर घोषित केले होते. नाईकविरोधात आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादासाठी निधीपुरवठा आणि प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आरोप आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा