29.8 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरक्राईमनामाआजारपणाचा बहाणा करून तामिळनाडूच्या तुरुंगातून १७ कैदी फरार

आजारपणाचा बहाणा करून तामिळनाडूच्या तुरुंगातून १७ कैदी फरार

शोधासाठी १७ पथके तैनात

Google News Follow

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील थेक्कमपट्टी उप-कारागृहातून सोमवारी रात्री १७ कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांना आजारी पडल्याचे भासवून कोठडीत बोलावण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ला करून कैद्यांनी पलायन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली असून, फरार कैद्यांना पकडण्यासाठी १७ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व १७ कैदी एकाच कोठडीत बंद होते. त्यापैकी एकाला आकडी आल्याचे किंवा त्याची प्रकृती बिघडल्याचे भासवण्यात आले. त्यांना मदत करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी कोठडीत गेले असता कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला. तीन तुरुंग कर्मचारी जखमी झाले.

फरार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. शेजारील डिंडिगुल जिल्ह्यात १६ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून, या मार्गांवरून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मदुराई, डिंडिगुल आणि केरळमधील इडुक्की जिल्ह्यांतील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. फरार कैद्यांची छायाचित्रे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येचा आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार

भारत-बांगलादेश सीमेवर कुंपणाच्या कामाला वेग

पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघे पोलिसांच्या जाळ्यात

१०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक

मंगळवार सकाळपर्यंत, पळून गेलेल्या १७ कैद्यांपैकी चौघांना अटक करण्यात आली असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे. या घटनेच्या संबंधात दोन हेड कॉन्स्टेबलसह नऊ तुरुंग कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तुरुंग फोडण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, तामिळनाडूचे कायदा मंत्री निर्मल कुमार यांनी पुष्टी केली की, कैद्यांपैकी एकाने रक्षकांना कोठडीत बोलावण्यासाठी आजारी असल्याचे नाटक केले होते. ते एकाच ब्लॉकमध्ये होते आणि त्यांनी आकडी आल्याने कोणीतरी कोसळल्याचे नाटक केले. त्यानंतर त्यांनी तपासणीसाठी गेलेल्या वॉर्डन आणि इतर दोघांवर हल्ला केला, असे निर्मल कुमार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मंगळवार सकाळपर्यंत चार कैद्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा