29.9 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरक्राईमनामापुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघे पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघे पोलिसांच्या जाळ्यात

५ लाख ६४ हजार रुपयांच्या १,१२८ बनावट नोटा जप्त

Google News Follow

बनावट ५०० रुपयांच्या नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या १,१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. या उपकरणांची एकूण किंमत २१ हजार १०० रुपये आहे.

या प्रकरणी सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), शफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखानवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजित रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे.

पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना एक संशयित बनावट नोटा घेऊन महात्मा फुले मंडई परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पेठेतील महात्मा फुले मंडईच्या मागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर सापळा रचला. यावेळी सलमान राजे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या. या नोटांची एकूण किंमत ४ लाख २ हजार ५०० रुपये होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:

१०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक

राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या

वाराणसीच्या एअर शोदरम्यान लष्करी अधिकारी असल्याचा बनाव

गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी मच्छीमारांना अटक

सलमान राजे याची चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचे आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शफाज अन्सारी, विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी शफाज अन्सारी याच्या घरातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय, एप्सन कंपनीचा प्रिंटर, एचपी कंपनीचा मॉनिटर, लेनोवो कंपनीचा कीबोर्ड आणि माऊस, झेब्रॉनिक्स कंपनीचा सीपीयू तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा