29.4 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामाम्यानमार शस्त्र प्रशिक्षण प्रकरण; सात परदेशी नागरिकांना भारताबाहेर राहण्याची मुदतवाढ

म्यानमार शस्त्र प्रशिक्षण प्रकरण; सात परदेशी नागरिकांना भारताबाहेर राहण्याची मुदतवाढ

एनआयएच्या तपासासाठी न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

म्यानमारमधील सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिल्याच्या आरोपांप्रकरणी अमेरिकन नागरिक मॅथ्यू व्हॅनडाइक आणि सहा युक्रेनियन नागरिकांना भारताबाहेर राहण्याची परवानगी दिल्लीतील न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२७ पर्यंत वाढवली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रकरणातील विविध बाबींचा तपास पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

व्हॅनडाइकला यापूर्वी आपल्या मायदेशी परतण्यासाठी एका महिन्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार तो शुक्रवारी न्यायालयातील सुनावणीसाठी भारतात परतला. मात्र, त्याच्यासोबत आरोपी असलेले सहा युक्रेनियन नागरिक अद्याप भारतात परतलेले नाहीत. न्यायालयाने या सहा जणांना तसेच व्हॅनडाइकला भारताबाहेर राहण्याची मुदत वाढवून दिली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी, कॅप्टन स्मित यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी मशाल प्रज्वलनाचे निमंत्रण

महापौर, अमिताभ, दिलजित दोसांजसह शाळांना बॉम्बची धमकी

म्यानमारमधील शस्त्र प्रशिक्षण प्रकरणी मॅथ्यू व्हॅनडाइक भारतात परतला

तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप

एनआयएच्या आरोपानुसार, या सातही परदेशी नागरिकांनी म्यानमारमधील काही सशस्त्र गटांच्या सदस्यांना ड्रोन युद्धतंत्र, ड्रोन चालवणे, ड्रोनची जुळणी आणि जॅमिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. या गटांमध्ये चिन नॅशनल फ्रंट (CNF) आणि काचिन इंडिपेंडन्स आर्मी (KIA) यांचा समावेश असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता. या सातही जणांना मार्च २०२६ मध्ये बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (यूएपीए) अटक करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात एनआयएने यूएपीएअंतर्गत आरोपांचा समावेश केला नाही. त्यांच्याविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्यांतर्गत कथित उल्लंघनांबाबत आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणात व्हॅनडाइकला गेल्या महिन्यात न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजूर केला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा